सासुरवाडीत जावयाचा खून

By Admin | Updated: July 1, 2016 00:33 IST2016-07-01T00:19:16+5:302016-07-01T00:33:33+5:30

औरंगाबाद : दुचाकी गाडी खरेदी- विक्रीच्या व्यवहारातून झालेल्या वादानंतर सासुरवाडीच्या मंडळीने बेदम मारहाण करून जावयाचा खून केला. ही घटना गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास बुढीलेन येथे घडली.

Sasurwadi's blood | सासुरवाडीत जावयाचा खून

सासुरवाडीत जावयाचा खून


औरंगाबाद : दुचाकी गाडी खरेदी- विक्रीच्या व्यवहारातून झालेल्या वादानंतर सासुरवाडीच्या मंडळीने बेदम मारहाण करून जावयाचा खून केला. ही घटना गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास बुढीलेन येथे घडली.
हारुण अहेमद गुलाम मुस्तफा (४०, रा. जहागिरदारवाडा, बुढीलेन) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हारुण हा बुढीलेन सासुरवाडीजवळ राहत होता. त्याचा सासरा, सावत्र सासू आणि अन्य नातेवाईकांमध्ये संपत्तीच्या वादातून भांडण होत असे. त्याच्या एका नातेवाईकाने हारुण यास एक दुचाकी विकली होती. कागदपत्रे ते देण्यास टाळाटाळ करीत असल्याने गुरुवारी दुपारी तो गाडी घेऊन चुलत सासरा मेहराजउद्दीन याच्या घरी गेला. त्यावेळी त्याने तुझी गाडी मला नको. माझे पैसे परत कर, असे तो मेहराजउद्दीनला म्हणाला. वादातून मेहराजउद्दीन आणि त्याच्या मुलांनी हारुणवर लोखंडी सळईने हल्ला चढविला. हारुण गंभीर जखमी झाला. त्यास घाटीत दाखल करण्यात आले.
उपचार सुरू असताना सायं. पावणेसातला हारुणचा मृत्यू झाला. सिटीचौक ठाण्याचे निरीक्षक डी. एस. शिनगारे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळास भेट दिली. पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैैकी मेहराजउद्दीन, आसिफ, शाकेर, आकेफ यांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Sasurwadi's blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.