शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचांच्या वेतनाची बोंब; वाढीव मानधन सोडा, पूर्वी जे मिळायचे तेही नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 16:09 IST

मागील ६-७ महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही, त्यामुळे शासनाप्रति सरपंचांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागातील व्होट बॅँक मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने सरपंच, उपसरपंचांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. आता चार महिने झाले, पण अजूनही वाढीव मानधन तर दूरच, पूर्वी नियमित मिळणारे मानधनही रखडले आहे. त्यामुळे सरपंच, उपसरपंचांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या २००० पर्यंत आहे, त्या सरपंचांचे मानधन ३ हजारांवरून ६ हजार, तर उपसरपंचांचे मानधन हजार रुपयांवरून २ हजार रुपये करण्यात आले आहे. ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २००० ते ८००० पर्यंत आहे, त्या सरपंचाचे मानधन ४ हजारांवरून ८ हजार, तर उपसरपंचाचे मानधन दीड हजारांवरून ३ हजार करण्यात आले आहे. ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या ८००० पेक्षा जास्त आहे, त्या सरपंचाचे मानधन ५ हजारांवरून १० हजार रुपये, तर उपसरपंचाचे मानधन २ हजारांवरून ४ हजार रुपये करण्याचा निर्णय झालेला आहे.

सात महिन्यांपासून मानधन मिळेनादुप्पट मानधनाचे राहू द्या, पण पूर्वी जे नियमित मानधन मिळायचे ते देखील मागील ६-७ महिन्यांपासून मिळालेले नाही. त्यामुळे शासनाप्रति सरपंचांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

गावच्या कारभाऱ्यांचाच गाडा डगमगलागावात विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी, सामाजिक सलोखा आदींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सरपंच, उपसरपंच व सदस्यांची असते. मात्र, सहा-सात महिन्यांपासून वेतन रखडल्यामुळे गावकारभाऱ्यांवर ‘घरची भाकरी खाऊन मामाच्या शेळ्या हाकण्या’ची वेळ आली आहे.

जुनेच मिळाले नाही अन् दुपटीची घोषणापूर्वी जेवढे वेतन मिळायचे, तेही मागील सहा- सात महिन्यांपासून मिळालेले नाही. त्यामुळे गावकारभाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

सरपंचांचे मानधन का अडले?लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या मानधनामुळे अनेकांच्या वेतनावर परिणाम झाल्याची भावना काही सरपंचांनी ‘लोकमत’कडे बोलताना व्यक्त केली.

सदस्यांना बैठकीचा २०० रुपये भत्ताग्रामपंचायत सदस्यांना शासनाच्या माध्यमातून किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुठलेही वेतन किंवा मानधन दिले जात नाही. प्रत्येक महिन्यामध्ये एक मासिक सभा आयोजित केली जाते. अशा वार्षिक १२ सभेच्या उपस्थितीसाठी प्रत्येक सभेला दोनशे रुपयांप्रमाणे सदस्यांना भत्ता दिला जातो.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरsarpanchसरपंचzpजिल्हा परिषद