उपसरपंचाकडून सरपंचाचा विनयभंग
By Admin | Updated: July 14, 2017 00:33 IST2017-07-14T00:31:28+5:302017-07-14T00:33:17+5:30
भोकरदन (जि. जालना) : तालुक्यातील गारखेडा देवी येथील उपसरपंच अंबादास हिम्मतराव साबळे (४५) याने भर ग्रामसभेत खुर्चीच्या खाली पाडले

उपसरपंचाकडून सरपंचाचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन (जि. जालना) : तालुक्यातील गारखेडा देवी येथील उपसरपंच अंबादास हिम्मतराव साबळे (४५) याने भर ग्रामसभेत खुर्चीच्या खाली पाडले, तसेच अश्लील शिवागाळ केल्याचा आरोप सरपंचबार्इंनी केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी साबळे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गारखेडा देवीच्या सरपंच या महिला असून पती नसल्याने त्या स्वत:च सर्व कारभार पाहतात. त्यांच्या तक्रारीनुसार, उपसरपंच गेल्या दोन वर्षांपासून त्यांना हेतुपुरस्सर त्रास देत होता. नेहमी नेहमी विविध प्रकारच्या खोट्या तक्रारी करून बदनाम करण्याचे डावपेज उपसरपंच करीत होता, असे या तक्रारीत म्हटले आहे. गुरुवारी गावात ग्रामपंचायतीसमोर ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत मला न विचारता तुम्ही ठराव कसे घेता असे म्हणत सरपंचबार्इंना खुर्चीच्या खाली पाडून मारहाण केली अशी तक्रार सरपंचबार्इंनी दिल्यानंतर पोलिसांनी उपसरपंच अंबादास हिम्मतराव साबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेनंतर उपसरंपच फरार झाला. पुढील तपास वैशाली पवार या करीत आहेत.