ट्रकच्या धडकेत सरपंचाचा मृत्यू

By Admin | Updated: September 18, 2014 00:39 IST2014-09-18T00:29:07+5:302014-09-18T00:39:54+5:30

येणेगूर : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या रामपूर (ता. उमरगा) येथील सरपंच नारायण बळीराम कांबळे (वय ३०) यांचे बुधवारी पहाटे उपचारादरम्यान निधन झाले.

Sarpanch's death in trucks | ट्रकच्या धडकेत सरपंचाचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत सरपंचाचा मृत्यू


येणेगूर : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या रामपूर (ता. उमरगा) येथील सरपंच नारायण बळीराम कांबळे (वय ३०) यांचे बुधवारी पहाटे उपचारादरम्यान निधन झाले.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, १५ सप्टेंबर रोजी नारायण कांबळे हे दस्तापूर येथील बहिणीस भेटण्यासाठी महामार्गाच्या कडेने पायी जात असताना, मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्र. एपी १२/७९४८ ची जोराची धडक बसून कांबळे गंभीर जखमी झाले होते. उमरगा येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू असताना मंगळवारी रात्री त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना पुढील उपचारार्थ सोलापूरकडे नेताना वाटेतच त्यांचा आष्टामोडदरम्यान मृत्यू झाला. घटनेची फिर्याद विलास बळीराम कांबळे यांनी मुरूम पोलिस ठाण्यात दिल्यावरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेचा अधिक तपास पोहेकॉ. एच. एस. महाबोले करीत आहेत. ट्रकचालकाचे नाव समजू शकले नाही. नारायण कांबळे यांचे शवविच्छेदन येणेगूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. दिनकर जोशी यांनी करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. (वार्ताहर)

Web Title: Sarpanch's death in trucks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.