शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, आता राजकीय पक्षांची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 6:57 PM

अनुसुचीत जाती व अनुसुचित जमातीचे २३ जागांचे आरक्षण कायम ठेवण्यात येवुन उर्वरीत ९१ जागेसाठी नव्याने प्रक्रिया राबवुन आरक्षण कायम करण्यात आले.

ठळक मुद्देऔरंगाबाद तालुक्यात एकुण ११४ ग्रामपंचायती आहेत.शरणापूर, पंढरपूर, तिसगावमध्ये महिलाराज

करमाड (औरंगाबाद ) : उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षण कायम ठेवण्यात येऊन इतर प्रवर्गासाठी ग्रामपंचायत सरपंच पदाचे शुक्रवारी (दि.२९) आरक्षण कायम करण्यात आले. आरक्षण पदासाठी वापरण्यात आलेली प्रक्रिया जुनीच असून, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण जागेसाठी नव्याने चिठ्ठी काढण्यात आली. त्यामुळे महिलांच्या जागी पुरूष किंवा पुरुषांच्या जागी महिला असा पाच ते दहा टक्के बदल आढळून आला. 

औरंगाबाद तालुक्यातील राजकीय दृष्टया महत्वाच्या असलेल्या शरणापुर,पंढरपुर,तिसगाव या मोठया ग्रामपंचायतीवर आता महिला राज पहायला मिळणार आहे. स्थानिक आघाड्या ज्यांच्याकडे आहेत तोच राजकीय पक्ष आता सत्तेजवळ जाणार आहे. सरपंच पदाच्या निवडणूकीत सर्वच राजकीय पक्षांची आता खरी कसोटी लागणार असुन कोणत्या राजकीय पक्षाकडे किती ग्रामपंचायती जातात हे स्पष्ट होणार आहे. बहुतेक ग्रामपंचायतीचे सदस्य सहलीवर गेले असुन उर्वरीत सदस्य अज्ञात स्थळी जाण्याच्या तयारीत आहेत. सर्वांचे डोळे आता सरपंच पद निवडणुकीकडे लागले आहे.

औरंगाबाद तालुक्यात एकुण ११४ ग्रामपंचायती आहेत. या सर्व ग्रामपंचायतीचे शुक्रवारी (दि.२९) भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आलेल्या सोडतीपैकी अनुसुचीत जाती व अनुसुचित जमातीचे २३ जागांचे आरक्षण कायम ठेवण्यात येवुन उर्वरीत ९१ जागेसाठी नव्याने प्रक्रिया राबवुन आरक्षण कायम करण्यात आले. प्रतिक्षा साईनाथ पचलोरे या बालिकेच्या हस्ते डब्यामधुन सर्वसमक्ष चिठ्ठ्या काढण्यात आल्या. समोरचा हॉल खचाखच भरलेला होता. तर व्यासपिठावर उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार शंकर लाड,नायब तहसीलदार प्रभाकर मुंडे,रेवनाथ ताठे,सचिन वाघ आदींची उपस्थिती होती. 

सरपंच आरक्षण सोडत :अनुसुचित जातीसाठी २० व अनुसुचित जमातीस ३ अशा एकुण २३ जागांसाठी ८ डिसेंबर २०२० रोजी काढण्यात आलेले आरक्षण कायम ठेवण्यात आलेले आहे. उर्वरित९१ जागेसाठी काढण्यात आलेले आरक्षण खालीलप्रमाणे

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)जटवाडा, गोलटगाव, गारखेडा, वंजारवाडी, लिंगदरी, वळदगाव, वडगाव कोल्हाटी, पिंपळखुटा, टोणगाव, कुंभेफळ, ओव्हर, मंगरूळ, पांढरी पिंपळगाव, चिंचोली,झाल्टा.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी महिला)शरणापुर, आडगाव सरक, शेंद्राबन, गिरनेरा, खेाडेगाव, सांजखेडा, माळीवाडा, देमणी, पाचोड, निपाणी, पंढरपुर, गोलवाडी, नायगव्हाण, भिंदोन, भालगाव, तिसगाव.

सर्वसाधारण(३० जागा)घारदोन,वरझडी,दौलताबाद,करमाड,भांबर्डा,पोखरी,मांडकी,कोनवाडी,सिंदोन,महालपिंप्री,वरूड,वडखा,गेवराई कुबेर, सताळा ,कोळघर,सावंगी,डायगव्हाण,पिंपळगाव पांढरी,मोरहिरा,शिवगड तांडा,घारेगाव एकतुणी,आब्दीमंडी,पिसादेवी,कौडगाव जालना , आडगाव माहोली,अंजनडोह,वाहेगाव ,परदरी,काद्राबाद,गांधेली.

सर्वसाधारण -महिला राखीव(३० जागा)शेलुद,चारठा,मुरूमखेडा,चित्ते पिंपळगाव, पिरवाडी,लायगाव,जडगाव,सटाणा,खामखेडा,एकोड,गेवराई ग्रुकबाँड,बनगाव,काऱ्होळ, शेवगा, लाडगाव, दुधड,रावसपुरा,चितेगाव,जळगाव फेरण,शेंद्रा कमंगर,राहाळपटटी तांडा,गाडे जळगाव,शेकटा,ढवळापुरी ,करोडी,जोडवाडी,पिंप्री खु ,बाळापुर,घारेगाव पिंप्री,कृष्णपुरवाडी.

टॅग्स :sarpanchसरपंचAurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायत