आजाराला वैतागून सरपंचाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:04 IST2021-04-04T04:04:12+5:302021-04-04T04:04:12+5:30
लासूर स्टेशन : गंगापूर तालुक्यातील वसुसायगावच्या सरपंचाने शनिवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. विठ्ठल तुकाराम शेजवळ ...

आजाराला वैतागून सरपंचाची आत्महत्या
लासूर स्टेशन : गंगापूर तालुक्यातील वसुसायगावच्या सरपंचाने शनिवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. विठ्ठल तुकाराम शेजवळ (वय ६०) असे आत्महत्या करणाऱ्या सरपंचाचे नाव आहे. आत्महत्या करण्यामागचे ठोस कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र, आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी माहिती समोर येत आहे.
दोन महिन्यांपूर्वीच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वसुसायगावच्या सरपंचपदी विठ्ठल तुकाराम शेजवळ यांची निवड झाली. त्यांनी पदभार हाती घेताच गावातील विकासकामांना सुरुवात केली. ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत गावातील शौचालयांची कामेदेखील सुरू झाली आहेत. मात्र, दिलदार मनाच्या या गावप्रमुखाने शनिवारी रात्रीच्या सुमारास आपल्या आयुष्याची दोरी कापून घेतली. घराशेजारील झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. त्यांनी ही आत्महत्या आजारपणाला वैतागून केली असावी, अशी माहिती गावकऱ्यांकडून दिली जात आहे.
सरपंच शेजवळ यांच्या आत्महत्येमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात दोन पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे. लासूर स्टेशनच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शेजवळ यांची डॉ. जितेंद्र मंडावरे यांनी उत्तरीय तपासणी केली. शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश दिंडे करीत आहेत.
030421\img_20210403_200837_1.jpg
सरपंचाची आत्महत्या