सरपंचावरील लाचेचा गुन्हा रद्द; औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

By Admin | Updated: March 24, 2016 00:47 IST2016-03-24T00:33:21+5:302016-03-24T00:47:01+5:30

लातूर : वडगाव एक्की (ता. चाकूर) येथील सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह सहा जणांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल झालेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला.

Sarpanch bribe crime cancellation; Aurangabad bench's decision | सरपंचावरील लाचेचा गुन्हा रद्द; औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

सरपंचावरील लाचेचा गुन्हा रद्द; औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

लातूर : वडगाव एक्की (ता. चाकूर) येथील सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह सहा जणांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल झालेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला.
मौजे वडगाव येथील सांस्कृतिक सभागृह बांधण्यासाठी दोन लाख ५० हजार रुपये पंचायत समितीने मंजूर केले होते. मात्र सभागृह न बांधता रक्कम हडप केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे वाढवणा (ता. चाकूर) ठाण्यात देण्यात आली. त्यावरून सरपंच सावित्रीबाई घटकार, ग्रामसेवक मारोती गायकवाड, उपअभियंता सूरज गोव्हाड, शाखा अभियंता अण्णाराव पाटील, देवप्रिय डोळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा रद्द करावा म्हणून अ‍ॅड. एन. पी. पाटील जमालपूरकर यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली. सभागृह वडगाव येथे बांधले नाही, पण चिद्रेवाडी येथे बांधले असल्याचा अहवाल पोलिसांनी सादर केला होता. त्यावरून खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Sarpanch bribe crime cancellation; Aurangabad bench's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.