सरपंच,ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:53 IST2017-07-22T00:50:06+5:302017-07-22T00:53:22+5:30

नांदेड: शौचालय बांधकामाच्या थंडावलेल्या मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हा परिषदेने आता सरपंच व ग्रामसेवकांवर जबाबदारी टाकली आहे़

The Sarpanch and the Gramsevak will take action against them | सरपंच,ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा

सरपंच,ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: शौचालय बांधकामाच्या थंडावलेल्या मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हा परिषदेने आता सरपंच व ग्रामसेवकांवर जबाबदारी टाकली आहे़ शंभर टक्के उद्दिष्टासाठी पुढील काही महिन्यांत सुमारे २ लाख २० हजार शौचालयांचे बांधकाम करावे लागणार असून गाव हागणदारीमुक्त न झाल्यास सरपंच व ग्रामसेवकांना जबाबदार धरण्यात येणार आहे़
प्रत्येक सरपंच व ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील उर्वरित शौचालय बांधून जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे़ जिल्ह्याचे उद्दिष्ट ४ लाख ३६ हजार ५१३ असून त्यापैकी २ लाख ११ हजार ४३९ शौचालय पूर्ण झाले आहेत़ २ आॅक्टोबर २०१७ पर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्यात येणार असून त्यासाठी तयारी सुरु आहे़
दरम्यान, अर्धापूर व मुदखेडनंतर आता भोकर, उमरी, हदगाव, हिमायतनगर, धर्माबाद ही तालुके शंभर टक्के हागणदारीमुक्तीच्या वाटेवर आहेत़, परंतु उर्वरित तालुक्यांत अजूनही शौचालयांची कामे रखडली आहेत़ त्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांना प्रशासनाने पत्र देऊन गाव हागणदारीमुक्तीची संपूर्ण जबाबदारी सोपविली आहे़ जिल्हा हागणदारीमुक्त करायचा आहे़ मात्र याकडे काही सरपंच व ग्रामसेवकांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे़ यापुढे गाव हागणदारीमुक्त न झाल्यास स्वस्त धान्य दुकानातून कोणत्याही प्रकारचे धान्य मिळणार नाही़ वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभही घेता येणार नाही़ तसेच मतदानही करता येणार नाही़, असे नमूद केले आहे़

Web Title: The Sarpanch and the Gramsevak will take action against them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.