साडी तर नाही मिळाली, सोन्याची पोत मात्र गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:02 IST2021-01-02T04:02:27+5:302021-01-02T04:02:27+5:30

===================== मित्राच्या घरात चोरी करून आरोपी पसार औरंगाबाद : एकत्र राहणाऱ्या मित्रांच्या खोलीतून मित्रानेच त्यांचा लॅपटॉप, चार मोबाईल आणि ...

The sari was not found, but the gold texture was gone | साडी तर नाही मिळाली, सोन्याची पोत मात्र गेली

साडी तर नाही मिळाली, सोन्याची पोत मात्र गेली

=====================

मित्राच्या घरात चोरी करून आरोपी पसार

औरंगाबाद : एकत्र राहणाऱ्या मित्रांच्या खोलीतून मित्रानेच त्यांचा लॅपटॉप, चार मोबाईल आणि दुचाकी चोरून नेल्याची घटना २९ डिसेंबर रोजी रात्री पदमपुरा भागात घडली. याविषयी वेदांतनगर पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविला.

रोहित किशोर लोहिया (रा. कोपरगाव, जि. अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार पुष्कर प्रकाश सोनवणे (रा. मनजित रेसिडेन्सी, पदमपुरा) हा २९ डिसेंबर रोजी मित्रांसह घरी झोपलेला होता. तेव्हा तेथे आरोपी रोहितसुद्धा होता. रात्री अचानक रोहित याने ३५ हजारांचा लॅपटॉप, रोख रक्कम, घड्याळ आणि आदित्य मोरस्कर यांचा मोबाईल आणि एटीएम कार्ड, अमोल भाग्यवंत यांचा मोबाईल, रोहित गवारे, प्रसन्नजित बनसोडे आणि विशाल भंडारे यांचे मोबाईल चोरून नेले. सकाळी सर्व झोपेतून उठले असता त्यांना हा प्रकार समजला. अधिक माहिती घेतली तेव्हा त्यांची मोटारसायकल सुद्धा चोरी झाल्याचे नजरेस पडले. या घटनेनंतर सोनवणे यांनी आरोपी मित्राविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदविली. हवालदार समद पठाण तपास करीत आहेत.

Web Title: The sari was not found, but the gold texture was gone