मळणीयंत्रात साडी अडकून महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2017 00:50 IST2017-02-26T00:49:21+5:302017-02-26T00:50:54+5:30
औसा : तालुक्यातील होळी येथे महिला शेतकरी अनुसया त्र्यंबक जाधव (वय ५८) यांची मळणी यंत्रात साडी अडकल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.

मळणीयंत्रात साडी अडकून महिलेचा मृत्यू
औसा : तालुक्यातील होळी येथे महिला शेतकरी अनुसया त्र्यंबक जाधव (वय ५८) यांची मळणी यंत्रात साडी अडकल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात अद्याप कुठलीही नोंद नाही़
अनुसया जाधव या शेतात शुक्रवारी कुटुंबियांसमवेत हरभऱ्याची रास करत होत्या. दरम्यान, मळणीयंत्र सुरू असताना त्यांच्या साडीचा पदर मळणीयंत्रात कधी अडकला हे समजले नाही़ त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती कुटुंबियांनी दिली. मयत अनुसया जाधव यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले़ याप्रकरणी औसा पोलीसात कुठलीही नोंद नाही़