सरीवर सरी...कार्यक्रमात सखींचा जल्लोष
By Admin | Updated: July 14, 2014 01:01 IST2014-07-13T23:22:15+5:302014-07-14T01:01:40+5:30
जालना :लोकमत सखीमंच व सेवाराम प्रभूदास सिंधी आयोजित सरीवर सरी.. या मराठी व हिंदी गीतांच्या कार्यक्रमास सखीमंच सदस्यांनी दिलेल्या उत्फूर्त प्रतिसादामुळे वातावरण सुरेल बनले होते.

सरीवर सरी...कार्यक्रमात सखींचा जल्लोष
जालना :लोकमत सखीमंच व सेवाराम प्रभूदास सिंधी आयोजित सरीवर सरी.. या मराठी व हिंदी गीतांच्या कार्यक्रमास सखीमंच सदस्यांनी दिलेल्या उत्फूर्त प्रतिसादामुळे वातावरण सुरेल बनले होते. कलावंतांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक अशा सरस गीतांना सखींनी जोरदार दाद दिली.
प्रारंभी दीपप्रल्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी सेवाराम प्रभूदास सिंधी फर्मचे जगदीश नित्याणी, अनिकेत नित्याणी, बजाज इलेक्ट्रॉनिक्सच्या सोनी राजेश बजाज, राजेश बजाज, बालाप्रसाद लोहिया, सुभाष घोडेगाववाले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. लोकमत सखीमंच सदस्य नेहमीच सदस्यांसाठी विविध दर्जेदार असे कार्यक्रम राबिवते. याचाच भाग म्हणून रविवारी सायंकाळी अनघा काळे प्रस्तुत ‘सरीवर सरी’ हा मराठी व हिंदी गीतांची सुरेल अशी मैफल पार पडली. गौरव पवार, रवींद्र खोमणे, विनोद वावळ, जितेंद्र साळवी, राजेश जगदान व अभय गायकवाड आदींनी सुंदर अशी साथ दिली.
या सुंदर मैफीलीचा प्रारंभ गणेश वंदनाने झाली. देवी श्री गणेशा या गीतानंतर मैफलीत एकाहून एक अशा सुरेल गीतांचा खजिना सखीमंच सदस्यांसाठी उघडला. यात प्रामुख्याने प्रेम गीत, भक्तीगीत, लावण्या, जोगवा आदी विविध प्रकरांतील गीतांनी सदस्यांवर गारुड केले. काही सदस्यांनीही ठेका धरुन आपला आनंद व्यक्त केला. मन उधान वाऱ्याचे, रुपेरी वाळूच्या बनात येना.., शोधू कोठे मी तुला, मेरी आशिकी, निशाना तुला दिसला.., तुजी ताल तुरू तुरु..,साजनी येना, डिपांग, डिपांग, तुझ्या प्रीतीचा विंचू मला चावला, रेशमाच्या धाग्याने, खंडे रायाच्या लग्नाला,आई भवानी, ढगाला लागली कळं.., लुंगी डान्स, हिल पोरी हिला.., मुंगळा, चोरीचा मामला, पान बनारस वाला, जीव रंगला,जय जय महाराष्ट्र अशा मराठमोठ्या दर्जेदार गीतांना नाट्यगृह दणादणून गेले होते. अनेक गाण्यांना वन्समोअरही मिळाला. सायंकाळी पाच वाजता सुरु झालेली सुरांची मैफील उत्तरोत्तर चांगली रंगत केली. सखीमंच सदस्यांमुळे सभागृह तुडूंब भरले होते.या कार्यक्रमाबद्दल अनेक सखींनी आपल्या उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया नोंदविल्या.
कविता बाफना म्हणाल्या, प्रथम हा कार्यक्रम केल्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद. या कार्यक्रमात मराठी व हिंदी गीतांचा सुरेख संगम आढळून आला. खूप आनंद झाला. विमल महाजन म्हणाल्या, सरीवर सरी हा कार्यक्रम ऐकून आनंद झाला.
मराठी व हिंदी गीतांचा मनमुराद आनंद लुटला. प्रणिता अंभोरे म्हणाल्या, लोकमत सखीमंचने असे कार्यक्रम वारंवार आयोजित करावेत. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे चांगले व्यासपीठ आहे. सुनंदा अबोले, निषा गुजर, रेश्मा तारगावकर यांच्यासह अन्य सखीमंच सदस्यांनी कार्यक्रमांची प्रशंसा केली. असे कार्यक्रम नेहमी आयोजित करावेत, अशी आग्रही मागणीही अनेक सदस्यांनी यावेळी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
सखीमंच सदस्यांनी धरला ठेका
सरीवर सरी या मराठी व हिंदी गीतावर कार्यक्रमात महिला व युवतींनी चांगलाच ठेका धरला होता. काही सदस्यांनी तर मंचावर येऊन आपली कला सादर केली. सायंकाळी पाच वाजता सुरु झालेला कार्यक्रम उत्तरोत्तर चांगलाच रंगत गेला. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच सभागृह अक्षरश: तुडूंब झाल्याने अनेक महिलांसाठी अतिरिक्त खुर्च्या लावून व्यवस्था करावी लागली. काहींनी उभे राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.