जिल्ह्यातील ५२ शाळांनी गाठली शंभरी
By Admin | Updated: June 9, 2015 00:33 IST2015-06-09T00:33:22+5:302015-06-09T00:33:22+5:30
उस्मानाबाद : दहावीच्या निकालात यंदा तब्बल ५२ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे़ गतवर्षी २४ शाळांचा १०० टक्के निकाल लागला होता़

जिल्ह्यातील ५२ शाळांनी गाठली शंभरी
उस्मानाबाद : दहावीच्या निकालात यंदा तब्बल ५२ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे़ गतवर्षी २४ शाळांचा १०० टक्के निकाल लागला होता़ त्या तुलनेत यंदाच्या निकालात शंभरी गाठणाऱ्या शाळांच्या संख्येत २८ शाळा वाढल्या आहेत. यात सर्वाधिक भूम तालुक्यातील १० तर वाशी तालुक्यातील केवळ एका शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे़ तर कळंब तालुक्यातील डिकसळ येथील केंद्रीय अनु़जाती माध्य़ निवासी आश्रमशाळेचा निकाल शून्य टक्के लागला आहे़
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा यात १९ शाळांची भर पडली असून, ४३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे़ यात उस्मानाबाद शहरातील तेरणा पब्लिक स्कूल, विद्यामाता विद्यालय, बालाजी नगर परिसरातील धिरूभाई अंबाणी विद्यालय, समता नगरातील सिटी प्राईड सेकंडरी इंग्लिश स्कूल, व इतर दोन शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे़ तालुक्यातील बामणी येथील श्री हनुमान विद्यालय, वाडी बामणी येथील तुळजाई विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे़
भूम शहरातील जिल्हा परिषद शाळा, सौ़ राणी ताराराजा कन्या प्रशाला, वालवड येथील जिल्हा परिषद हायस्कूल, पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू विद्यालय, कुंथलगिरी येथील श्री देशभूषण कुलभूषण विद्यालय, आंबी येथील आंबिका विद्यालय, गिरवली येथील लोकसेवा हायस्कूल, पाथ्रूड येथील नूतन कन्या प्रशाला, जांब येथील न्यू हायस्कूल, अंतरवली येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय, पाटसांगवी येथील पाटसांगवी विद्यालय, देवळाली येथील नूतन विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे़
कळंब तालुक्यातील शिराढोण येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय, शेलगाव (दि़) येथील संत मदर तेरेसा माध्यमिक विद्यालयासह इतर एका शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे़ लोहारा तालुक्यातील शेलगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, माकणी येथील सरस्वती विद्यालय, राजेगाव येथील शरद पवार विद्यालय, सास्तूर येथील निवासी अपंग विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे़ उमरगा तालुक्यातील मुरूम जिल्हा परिषद हायस्कूल, बेळंब येथील लालबहाद्दूर शास्त्री विद्यालय, उमरगा येथील उर्दू हायस्कूल, उमरगा शहरातीलच ‘द रायजिंग सन इंग्लिश स्कूल’ सह इतर दोन शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे़ परंडा तालुक्यातील चिंचपूर (बु़) येथील विजयसिंह विद्यालय, शिराळा येथील रामेश्वर विद्यालय, देवगाव (खु़) येथील सिध्देश्वर विद्यालय, रोहकल येथील येथील नवीन माध्यमिक विद्यालयासह इतर एका शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे़
तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील जिल्हा परिषद शाळा, सलगरा (दि़) येथील जिल्हा परिषद हायस्कूल, जळकोट येथील पार्वती कन्या प्रशाला, गंधोरा येथील इंदिरा गांधी विद्यालय, जळकोटवाडी (नळ) येथील इंदिरा काळे प्रशाला, सलगरा (दि़) येथील डॉ़ शामप्रसाद एम़ सेंट्रल, कार्ला येथील अहिल्यादेवी होळकर विद्यालय, सलगरा (म) येथील ज्ञानदीप विद्यालय, चिकुंद्रा येथील श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, सांगवी काटी येथील मॉडर्न हायस्कूल, निलेगाव येथील महात्मा गांधी विद्यालय, कुंभारी येथील श्रीहरी प्रशालेचा १०० टक्के निकाल लागला आहे़ वाशी तालुक्यातील घाटपिंपरी येथील न्यू हायस्कूल व विजोरा येथील विद्या विकास विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे़ (प्रतिनिधी)