उत्कृष्ट क्लब अध्यक्ष पुरस्काराने संजय कासलीवाल सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:02 IST2021-06-11T04:02:07+5:302021-06-11T04:02:07+5:30

लायन्स क्लब औरंगाबाद मिडटाऊन २०२०-२१ च्या संमेलनामध्ये संजय कासलीवाल यांना उत्कृष्ट कारकीर्दीबद्दल, 'बहुप्रांतीय बेस्ट क्लब प्रेसिडेंट (प्लॅटिनम)' या ...

Sanjay Kasliwal honored with Outstanding Club President Award | उत्कृष्ट क्लब अध्यक्ष पुरस्काराने संजय कासलीवाल सन्मानित

उत्कृष्ट क्लब अध्यक्ष पुरस्काराने संजय कासलीवाल सन्मानित

लायन्स क्लब औरंगाबाद मिडटाऊन २०२०-२१ च्या संमेलनामध्ये संजय कासलीवाल यांना उत्कृष्ट कारकीर्दीबद्दल, 'बहुप्रांतीय बेस्ट क्लब प्रेसिडेंट (प्लॅटिनम)' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कासलीवाल यांनी त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात अनेक स्तुत्य उपक्रम राबविले. त्यांच्या या मेहनती आणि समर्पित सेवा कार्यकाळाबद्दल या संमेलनामध्ये विशेष कौतुक करण्यात आले.

त्याच प्रकारे 'जीएसटी ॲचिव्हमेंट गोल्ड' चा पुरस्कार राजेंदर माहेश्वरी. चाइल्डहूड कॅन्सर गोल्ड व बेस्ट कोविड योद्धा म्हणून हिमांशू गुप्ता यांना गौरविण्यात आले. विभागीय अध्यक्षासाठीचा विशेष पुरस्कार स्मिता मालपाणी यांना देण्यात आला. बहुप्रांत ३२३४ मध्ये मुंबईशिवाय उर्वरित महाराष्ट्राचा समावेश आहे.

विद्यमान बहुप्रांत अध्यक्ष गिरीश मालपाणी यांनी हा पुरस्कार जाहीर केला. या संमेलनात आंतरराष्ट्रीय संचालक नवल मालू तसेच प्रांतीय व नवनिर्वाचित लायन्स बहुप्रांतीय अध्यक्ष विवेक अभ्यंकर यांची उपस्थिती होती. चारही प्रांतातील प्रांतपालांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. या वार्षिक संमेलनात इतर मान्यवर व १२०० लायन्स सदस्यांची उपस्थिती होती, अशी माहिती लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद मिडटाऊनचे सचिव राजेंद्र माहेश्वरी यांनी दिली.

कॅप्शन

संजय कासलीवाल

Web Title: Sanjay Kasliwal honored with Outstanding Club President Award