स्वच्छता, पाण्याअभावी नागरिक त्रस्त

By Admin | Updated: July 24, 2014 00:26 IST2014-07-24T00:06:24+5:302014-07-24T00:26:21+5:30

देगलूर : उशिरा का होईना शासनाने पालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली आणि संप मागे घेण्यास भाग पाडले.

Sanitation, crippled citizens due to lack of water | स्वच्छता, पाण्याअभावी नागरिक त्रस्त

स्वच्छता, पाण्याअभावी नागरिक त्रस्त

देगलूर : उशिरा का होईना शासनाने पालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली आणि संप मागे घेण्यास भाग पाडले. दरम्यान, संपाच्या काळात देगलूर शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे साचले असून पाणीपुरवठ्याचे तीनतेरा वाजले आहेत.
राज्यातील अन्य ठिकाणी असलेल्या नगर परिषदेच्या तुलनेत मराठवाड्यातील न. प . कर्मचाऱ्यांंवर सतत अन्याय होत आला आहे. मराठवाड्यातील कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळत नाही. पेन्शन, आजारी रकमेची देयके, ग्रॅच्युईटी अंशदानाची रक्कम कधीच वेळेवर मिळत नाही. त्यामुळे न.प. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. कर्जबाजारीपणामुळे अत्यंत त्रास होतो. या अपमानजनक जीवन जगण्याला कंटाळलेल्या न.प. कर्मचाऱ्यांनी गेल्या आठ दिवसांपासून आपल्या न्यायसंगत मागण्या मान्य करुन घेण्यासाठी बेमुदत संप पुकारला होता. न.प. कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे नगर विकास राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य न.प. कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष विश्वनाथ घुगे, सरचिटणीस रामेश्वर वाघमारे, मराठवाडा (विभागीय अध्यक्ष मारोतराव गायकवाड यांच्यात झालेली चर्चा असफल ठरल्याने बेमुदत संप सुरूच होता. बुधवारी संप मागे घेण्यात आला. संपामुळे रमजान महिना आणि अन्य सणावारांच्या काळात शहरात स्वच्छतेचा अभाव, पाणीपुरवठाचे तीनतेरा वाजले होते. या संपात देगलूर पालिकेचे हणमंत देशमुख, लालू सोनकांबळे, गोविंद तुंगेनवार, जब्बार कुरेशी, इम्तीयाज हुसेन, सायलू कुंडलवार, बालाजी कंतेवार, जावेद देशमुख, अब्दुल खादर, जब्बार अली, गंगा फरसे, लालाबाई डोपेठवाड, चंद्राबाई वाघमारे, सुशीलाबाई वनंजे, लक्ष्मीबाई वानखेडे, मार्तंड वनंजे, रामचंद्र उल्लेवाड, हरिशंकर ढगे, रत्नदीप सूर्यवंशी, संघरत्न ढवळे, दिनेश कळसकर, दत्तु मारावार, संगम शंकर शंखपाळे, रोयलावर, शिवलिंग गायकवाड, गंगाधर वाघमारे, लक्ष्मण कांबळे, रोजंदार कर्मचारी व सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
कंधारातील कर्मचाऱ्यांचे ‘मुंडन’ आंदोलन मागे
कंधार : न. प. कर्मचाऱ्यांचा संप सुरू होऊन आठवडाभरानंतर मागे घेण्यात आल्याने शासनाचा निषेध म्हणून कंधारात संपकरी कर्मचाऱ्यांनी ‘मुंडन’ आंदोलन २४ रोजी करण्याचे जाहीर केले. ते आता मागे घेण्यात आले. संपामुळे शहरातील स्वच्छता, पाणी पुरवठा, दिवाबत्ती आदी समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागले. शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिना उलटला आहे. अनेक प्रमाणपत्राची पालकांना शहरात न.प. कडून आवश्यक असतात. विद्युत जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र, रजिस्ट्रीसाठी नमुना नं. ४३ व नाहरकत प्रमाणपत्र, बांधकाम परवाना, नाव परिवर्तन, विवाह नोंदणी आदी कामासाठी नागरिकांना समस्या निर्माण झाली होती. उशिरा का होईना लक्ष देवून शासनाने तोडगा काढल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. शासनाचा निषेध म्हणून कर्मचाऱ्यांनी २४ जुलै रोजी ‘मुंडन’ करण्याचाही निर्णय घेतला होता. संपासाठी संघटनेचे अध्यक्ष दिपक गायकवाड, उपाध्यक्ष राहुल खोडसकर, सचिव पठाण बशीर यांच्या सह्या आहेत. संपात संजय फुले, जितेंद्र ठेवरे, शंकर मोरे, सुहास गायकवाड, अजीम उल्ला, सईदखाँ, राजेश जोंधळे आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)

Web Title: Sanitation, crippled citizens due to lack of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.