‘राष्ट्रीय ग्राम गौरव’साठी सांगवी गावाची निवड
By Admin | Updated: December 24, 2016 22:00 IST2016-12-24T21:58:22+5:302016-12-24T22:00:39+5:30
तामलवाडी : पंचायतराज सक्षमीकरण पुरस्कार राष्ट्रीय ग्राम गौरव ग्रामसभा २०१५-१६ अंतर्गत मराठवाड्यातून तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) गावाची निवड झाली आहे.

‘राष्ट्रीय ग्राम गौरव’साठी सांगवी गावाची निवड
तामलवाडी : पंचायतराज सक्षमीकरण पुरस्कार राष्ट्रीय ग्राम गौरव ग्रामसभा २०१५-१६ अंतर्गत मराठवाड्यातून तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) गावाची निवड झाली आहे. राज्यस्तरावरील स्पर्धेत गाव उतरले असून, या गावाची केंद्रीय पथकाद्वारे पुढील आठवड्यात पाहणी होणार आहे.
सांगवी (काटी) ग्रामपंचायतीने पंचायत राज सशक्तीकरणातून ग्रामसभा महिला ग्रामसभा केंद्र, राज्य सरकारच्या योजनांमधून उत्कृष्ट शौचालय बांधणीची अंमलबजावणी केली. त्यामुळे या सांगवी गावाची पंचायत राज सशक्तीकरण व राष्ट्रीय ग्राम गौरव ग्रामसभा पुरस्कारासाठी शिफारस केली होती. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातून एकमेव सांगवी गावाची विभागात निवड झाली आहे.
२०१७ करीता शिफारस केलेल्या पंचायत राज संस्थाची पुढील आठवड्यात केंद्रीय पथकाद्वारे पडताळणी करण्यात येणार असून, ही पडताळणी सुब्रतो भट्टाचार्य वरीष्ठ शाखा ग्रामीण विकास ट्रस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. २८ डिसेंंबरपासून केंद्रीय पथक उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येणार असून, सांगवी (काटी) ग्रामपंचायतीने दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी केली आहे.
शनिवारी ग्रामविकास अधिकारी देविदास चव्हाण यांनी जि.प. शाळा, अंगणवाडींना भेटी देवून नियोजनाबाबत सूचना दिल्या. तसेच गावकऱ्यांची बैठक घेवून राज्य पातळीवरील स्पर्धेत सहभाग घेण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.