भोकरदनमध्ये वाळू वाहणारी वाहने जप्त

By Admin | Updated: February 2, 2015 01:12 IST2015-02-02T01:02:49+5:302015-02-02T01:12:06+5:30

भोकरदन: तहसील कार्यालयाच्या भरारी पथकाने ३१ जानेवारी रोजी मध्यरात्री अवैध वाळुची वाहतूक करणारी तीन वाहने जप्त केल्याने वाळू माफीयात खळबळ उडाली आहे़

Sandwiches were seized in Bhokardan | भोकरदनमध्ये वाळू वाहणारी वाहने जप्त

भोकरदनमध्ये वाळू वाहणारी वाहने जप्त


भोकरदन: तहसील कार्यालयाच्या भरारी पथकाने ३१ जानेवारी रोजी मध्यरात्री अवैध वाळुची वाहतूक करणारी तीन वाहने जप्त केल्याने वाळू माफीयात खळबळ उडाली आहे़
३१ जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अविशकुमार सोनोने, तलाठी अभय देशपांडे, किरण घारेवाड, राम धनेश, बी़एमक़ाकड यांनी पोलीस फौजफाट्यासह ही मोहीम राबविली. जुईधरण पाटी जवळ एक टॅक्टर, खडकी येथे एक ट्रॅक्टर व चिंंचोली पाटीजवळ एक टिप्पर जप्त केले. ही तिन्ही वाहने तहसील कार्यालयासमोर उभी केली आहेत. एक टिप्पर रिकामे असल्याने त्याच्या विरूध्द कार्यवाही करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले़ दरम्यान, या कारवाईमुळे भोकरदनसह परिसरात खळबळ उडाली असून, वाळुमाफियांचे धाबे दणाणले आहेत. (वार्ताहर)
तळणी: मंठा तालुक्यातील दुधा येथून पुर्णा नदीचा पात्रातून अवैध वाळुचे उत्खनन करणाऱ्या टाक ळखोपा येथील १२ जणांना ७५ लाख रुपये दंड जमा करण्याची डेडलाईन सोमवारपर्यंतची देण्यात आली आहे. हा दंड न भरल्यास वाळू उपसानियमांअतंर्गत पोलीस गुन्हा दाखल क रु न उपप्रादेशिक परिवहन अधिक ारी यांच्यामार्फ त वाहने निलंबन क रण्याची क ारवाई के ली जाईल, अशी नोटीस तहसीलदार छाया पवार यांनी ३१ जानेवारी रोजी दिल्याने खळबळ उडाली आहे.
२८ जानेवारी रोजी संध्याक ाळी टाकळखोपा येथील १२ जण दुधा येथून अवैधरित्या वाळुची चोरी क रीत असल्याचे ग्रामस्थांनी दुधा सज्जाचे तलाठी एस.डी. पवार यांना सांगितले. पवार यांनी तात्काळ दोन पोलिसांसह घटनास्थळी धडक मारताच वाळू भरताना ट्रॅक्टर आढळून आले होते. कारवाईसाठी पुढे जाताच हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांनी पळ काढला होता. या घटनेची माहिती त्यांनी वरिष्ठांना दिली होती. त्यानंतर २९ जानेवारी रोजी दुपारी तहसीलदार छाया पवार यांनी या वाळुपट्याची पाहणी केली असता, दुधा येथील नदीचा पात्रातून अंदाजे ८ फु ट खोल व १५० फु ट रु ंद या आक ारांचे आठ खड्डे आढळुन आले होते.
पालकमंत्र्यांना निवेदन
किर्ला, उस्वद, देवठाणा, लिबखेडा, वझर सरकटे, भुवन, वाघाळा, कानडी येथून हजारो ब्रास वाळुची चोरी झालेली असताना अद्यापही क ारवाई झालेली नाही. या वाळुमाफियांना अभय देणाऱ्या तहसीलदारांना निलंबित करण्याची मागणी तळणी येथील कै लास सरक टे व झालमसिंग चदेल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Web Title: Sandwiches were seized in Bhokardan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.