तहसीलच्या पथकावर वाळूमाफियाचा हल्ला

By Admin | Updated: March 18, 2017 23:42 IST2017-03-18T23:39:14+5:302017-03-18T23:42:39+5:30

तुळजापूर : वाळूची चौकशी करण्यासाठी आलेल्या महसूल पथकातील अधिकाऱ्यांच्या जीपवर डंपर घातल्याची खळबळजनक घटना शनिवारी सायंकाळी शहरातील सांजा बायपास मार्गावरील हनुमाननगर भागात घडली़

Sandmafia attack on Tehsil's side | तहसीलच्या पथकावर वाळूमाफियाचा हल्ला

तहसीलच्या पथकावर वाळूमाफियाचा हल्ला

तुळजापूर : वाळूची चौकशी करण्यासाठी आलेल्या महसूल पथकातील अधिकाऱ्यांच्या जीपवर डंपर घातल्याची खळबळजनक घटना शनिवारी सायंकाळी शहरातील सांजा बायपास मार्गावरील हनुमाननगर भागात घडली़ या घटनेनंतर महसूलने तेथे साठविलेली वाळू जप्त केली असून, पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती़
महसूलच्या पथकाने मागील काही दिवसांपासून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे़ महसूलविभागाचे तलाठी खोत व त्यांच्या सहकाऱ्यांचे पथक नेहमीप्रमाणे शनिवारी सायंकाळीही अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत होते़ त्यावेळी शहरानजीकच्या सांजा बायपास मार्गावरील हनुमान नगर परिसरात वाळूचा साठा केला जात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती़ हे पथक त्यांची जीप घेऊन घटनास्थळी गेले होते़ त्यावेळी तेथील डंपर चालकाने थेट पथकातील जीपवर डंपर चालवून जीपला धडक देते तेथून पळ काढला़ घटनेची माहिती मिळताच प्रभारी तहसिलदार आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, नायब तहसीलदार राजेश जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेतली़ तसेच सपोनि दिगंबर शिंदे यांनी सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली़ महसूलच्या पथकाने इतर वाहने आणून जमा केलेली वाळू ताब्यात घेण्यास सुरूवात केली होती़ तर या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़ दरम्यान, पथकातील वाहनावरच वाळू माफियांनी हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे़

Web Title: Sandmafia attack on Tehsil's side

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.