संधिसाधू काळ्या बुरुशीपासून काळ्या बाजारापर्यंत- मंगला बोरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:04 IST2021-05-13T04:04:56+5:302021-05-13T04:04:56+5:30
औरंगाबाद : कोरोनाच्या रुग्णांमध्ये काळ्या बुरशीने थैमान घातले काय? अन् याचा सुगावा लागता क्षणी त्याच्या उपचारासाठी लागणारे ॲम्फोटेरेसीन इंजेक्शन ...

संधिसाधू काळ्या बुरुशीपासून काळ्या बाजारापर्यंत- मंगला बोरकर
औरंगाबाद : कोरोनाच्या रुग्णांमध्ये काळ्या बुरशीने थैमान घातले काय? अन् याचा सुगावा लागता क्षणी त्याच्या उपचारासाठी लागणारे ॲम्फोटेरेसीन इंजेक्शन गायब होते काय? सध्या गाजत असलेले म्युकरमायकोसिस ही जळी-स्थळी, काष्टी- पाषाणी असते. ही सफेद, करड्या किंवा तपकिरी रंगाची बुरशी शिळ्या अन्नावर, शेण इत्यादीवर दिसत असते. जेव्हा आपली प्रतिकारशक्ती कमी होते तेव्हा ही बुरुशी जीवघेणी बनू शकते. कोरोनाच्या उपचारात स्टेरॉईड्स, टोसीलीझुमॅब यांसारख्या औषधांमुळे रुग्णांचा जीव तर वाचतो. पण, त्याची इम्युनिटी खालावते आणि संधिसाधू जंतू त्यांची शिकार करू शकतात.
---
डॉ. अमोल सुलाखे, कान-नाक-घसा तज्ज्ञ
--
लवकर निदान देईल जीवदान
--
ही बुरशी नाकाद्वारे प्रवेश करून नाकात तसेच नाकाबाजूच्या पोकळ हाडांमध्ये वाढते.
--
लक्षणे
---
- नाकात कोरडेपणा, खपली, काळपट स्राव, गालाच्या हाडावर/दातांमध्ये दखुणे, गालावरती आधी काळसर ठिपका नंतर चट्टा. तोंडातून दुर्गंधी, टाळूला छिद्र पडणे, ताबडतोब उपचार केले नाही तर मृत्यूसुद्धा होऊ शकतो.
--
निदान
--
नाकाची एंडोस्कोपी, व्रण खरवडून सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासणे
---
उपचार
--
ॲम्फोटेरेसीन बी, आजार वाढलेला असेल तर तो भाग काढून टाकणे
----------------------------------
डॉ. मनोज सासवडे, नेत्र तज्ज्ञ
साध्या वाटणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
बुरशीचा आजार गांभीर रुग्णांमध्ये आयसीयूत असताना किंवा बाहेर पडल्यानंतर सुद्धा होऊ शकतो. लवकर उपचार झाले नाही तर डोळा काढून टाकण्याची वेळ येऊ शकते.
--
लक्षणे
--
डोळ्याभोवती / गालावर सूज, चेहऱ्यावर बधीरपणा / नाक चोंदणे, गालावर काळा ठिपका, अचानक दृष्टी जाणे, एकाचे दोन दिसणे, डोळा सुजून बाहेर येणे, डोळ्यावर झापड दिसणे.
---
डॉ. संजय पाटणे, कन्सल्टिंग फिजिशियन
--
प्रमुख कारणे
---
- रक्तातील साखर अनियंत्रितपणे वाढणे. जास्त काळ स्टेराॅईड्स देणे (विशेषतः मेथल प्रेड्निसोलोन).
- टोसीलीझुमॅबसारखी औषधे. कोविडच्या रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी ही औषधे द्यावी लागतात. पण, जर ही जास्त काळ जास्त प्रमाणात द्यावी लागली तर काळी बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
- ही बुरशी मेंदू, आतडे आणि फुफ्फुसावरसुद्धा दुष्परिणाम करू शकते.
--
उपचार
--
-रक्तातील साखर तातडीने नियंत्रणात आणणे
-ॲम्फोटेरेसीन बी चे इंजेक्शन, पोसेकोनॅझॉलसारखी तोंडावाटे घेण्याची औषधे. (तीन ते चार आठवडे)