वाळूजमध्ये पोटनिवडणुकीत संदीप तुपे विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 22:15 IST2019-06-24T22:15:11+5:302019-06-24T22:15:24+5:30
वाळूज ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत संदीप सुभाष तुपे हे ९९१ मते घेऊन विजयी झाले आहेत.

वाळूजमध्ये पोटनिवडणुकीत संदीप तुपे विजयी
वाळूज महानगर : वाळूज ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत संदीप सुभाष तुपे हे ९९१ मते घेऊन विजयी झाले आहेत. या जागेसाठी रविवारी मतदान झाले होते.
तत्कालीन सरपंच सुभाष तुपे यांचे गतवर्षी निधन झाल्यामुळे एक जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत २ हजार २९० पैकी १२०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
याची मतमोजणी सोमवारी करण्यात आली. तत्कालीन सरपंच सुभाष तुपे यांचे चिरंजीव संदीप तुपे यांनी ९९१ मते तर अनिल भुजंग यांना १४३ आणि विजय भालेराव यांना ५५ मते मिळाली. यावेळी १२ मतदारांनी ‘नोटा’ला मतदान केले.
निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर संदीप तुपे यांच्या समर्थकांनी जल्लोष करुन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सचिन काकडे, फैय्याज कुरैशी, रवी मनगटे, नंदु सोनवणे, हाफीज पटेल आदी उपस्थित होते.