वाळूजला चोरट्यांचा धुमाकूळ
By Admin | Updated: September 21, 2014 00:42 IST2014-09-20T23:46:40+5:302014-09-21T00:42:23+5:30
वाळूज महानगर : रहिमपूर येथे काल रात्री अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख ६५ हजार रुपये चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

वाळूजला चोरट्यांचा धुमाकूळ
वाळूज महानगर : रहिमपूर येथे काल रात्री अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख ६५ हजार रुपये चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
मोहीदखान हबीबखान (३१, रा. रहिमपूर, ता. गंगापूर) १९ सप्टेंबरला जेवण करून घरात कुटुंबियांसह झोपले. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घराची कडी शिताफीने उघडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरात ठेवलेले ८ ग्रॅम सोन्याचे झुमके, ५ ग्रॅम सोन्याचा हार, ६ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, ३ ग्रॅमची नाकातील नथणी, असे जवळपास ३५ हजार रुपयांचे दागिने लांबविले. यानंतर चोरट्यांनी घरातील कपड्याच्या बॅगमध्ये ठेवलेले रोख ६५ हजार रुपये, मोहीदखान यांच्या कंपनीचे रजिस्ट्रेशन आदी कागदपत्रे व एक २ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास मोहीदखान यांना जाग आली असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यांनी घरात तपासणी केली असता सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख ६५ हजार रुपये गायब झाल्याचे त्यांना दिसून आले. माहिती मिळताच फौजदार सुवर्णा देगलूरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी १ लाख ४ हजार रुपये चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.