शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा भेदून चंदन तस्कर सक्रिय; तीन वर्षात चोरट्यांनी पळविली चंदनाची ४० झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 19:08 IST

शहरात घरफोड्या, वाहनचोऱ्या सोबतच चंदन झाडांची चोरी सतत होत आहे.

ठळक मुद्देतस्करांचा म्होरक्या इलियास आजपर्यंत पोलिसांच्या हाती लागला नाही.चंदन तस्करांविरूध्दची खटले प्रलंबित

औरंगाबाद: चंदनाच्या लाकडाला सोन्याचा भाव मिळत असल्यामुळे शहरातील विविध ठिकाणी असलेली चंदनाची झाडाची चोरटे तोडून नेत आहेत. वर्षभरात १२ तर तीन वर्षात सुमारे ४० झाडे तस्करांनी तोडून नेल्याचे समोर आले. 

जिल्हाधिकारी यांचा बंगला, विभागीय आयुक्तालय, सुभेदारी विश्रामगृह , जिल्हा सत्र न्यायालय आदी महत्वाच्या ठिकाणाची कडक सुरक्षाकडे भेदून चंदन तस्करानी चंदनाची झाडे  तोडून नेल्याच्या घटना घडल्या.  शिवाय सामान्य नागरीकानी घराच्या अंगणात लावलेली आणि जीवापाड जपलेली चंदनाच्या झाडे चोरीला जाण्याच्या घटना  चार , सहा  दिवसाआड  घडत  आहेत. तस्करांवर कठोर कारवाई पोलीस प्रशासनाकडुन होत नसल्याने अकरा महिन्याच्या कालावधीत विविध ठिकाणाहून चंदनाची  १० झाडे आणि तीन वर्षात ४०  हुन अधिक झाडे तस्करानी तोडून नेल्याचे समोर आले. शहरात घरफोड्या, वाहनचोऱ्या सोबतच चंदन झाडांची चोरी सतत होत आहे. चंदन तस्करी करणाऱ्या एका चोरट्याला जवाहरनगर पोलिसांनी महिनाभरापूर्वी रंगेहात पकडले. तर पुंडलिकनगर पोलिसांनी सापळा रचून दोन तस्कराना अटक केली होती. चंदन तस्करांचा म्होरक्या इलियास मात्र आजपर्यंत पोलिसांच्या हाती लागला नाही. यामुळे चंदन तस्करी थांबायला तयार नाही.

चंदन तस्करांविरूध्दची खटले प्रलंबितदोन वर्षापूर्वी आमदार अतुल सावे यांच्या खडकेश्वर येथील कार्यालयाच्या आवारातील चंदनाचे झाड तोडून नेणाऱ्या आरोपीना पोलिसांनी अटक केली होती. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. आरोपी जमानत घेऊन बाहेर आले आहेत. तर चंदन तस्करी करणाऱ्या आरोपीना शिक्षा लागल्याचे एकही ताजे उदाहरण नाही. यामुळे चंदन तस्कर अटकेला न घाबरता संघटितपणे चंदनाची झाडे शोधून तोडून नेत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :theftचोरीAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी