वाळूचा ट्रक लटकला पुलावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2017 23:47 IST2017-05-09T23:41:15+5:302017-05-09T23:47:16+5:30
तेर : वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील ट्रकच्या चालकाचा ताबा सुटल्याने पुलावर धडकला़ सुदैवाने अर्धा ट्रक पुलावर लटकल्याने मोठा अनर्थ टळला़

वाळूचा ट्रक लटकला पुलावर
लोकमत न्यूज नेटवर्क
तेर : वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील ट्रकच्या चालकाचा ताबा सुटल्याने पुलावर धडकला़ सुदैवाने अर्धा ट्रक पुलावर लटकल्याने मोठा अनर्थ टळला़ हा अपघात मंगळवारी सकाळी उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील संत गोरोबाकाका मंदिराजवळील पुलावर घडला़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गंगाखेड येथून वाळू घेऊन एक मालवाहतूक ट्रक (क्ऱएम़एच़२५- एऩ५४८५) हा मंगळवारी सकाळी उस्मानाबादकडे येत होता़ हा ट्रक तेर येथील श्री संत गोरोबाकाका मंदिराजवळील पुलावर आल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक पुलाच्या लोखंडी कठड्याला धडकला़ अर्धा ट्रक कठड्यावर गेल्यानंतर ट्रक अडकला़ सुदैवाने ट्रक नदीपात्रात कोसळला नसल्याने मोठा अनर्थ टळला़ घटनेनंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती़ दरम्यान, वाळू वाहतुकीस बंदी असतानाही अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक सुरू असून, प्रशासनाने याकडे लक्ष कारवाईची मोहिम हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे.