परवानगीविना बोटीने वाळू उपसा

By Admin | Updated: July 10, 2014 00:48 IST2014-07-09T23:59:10+5:302014-07-10T00:48:16+5:30

औंढा नागनाथ : तालुक्यातील पुर्णा नदीच्या पात्रामध्ये वाळूच्या धक्यांवर महसूल विभागाची कुठलीही परवानगी न घेता बिनधास्तपणे ठेकेदार बोटींगच्या सहाय्याने वाळूचा उपसा करीत आहेत.

Sand stove by boat without permission | परवानगीविना बोटीने वाळू उपसा

परवानगीविना बोटीने वाळू उपसा

औंढा नागनाथ : तालुक्यातील पुर्णा नदीच्या पात्रामध्ये वाळूच्या धक्यांवर महसूल विभागाची कुठलीही परवानगी न घेता बिनधास्तपणे ठेकेदार बोटींगच्या सहाय्याने वाळूचा उपसा करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडल्या जात असून तो नफा वाळू माफीयांचा खिशामध्ये जातांना दिसून येत आहे.
औंढा नागनाथ तालुक्यामध्ये यावर्षी जडगाव, लाख, पूर, सिद्धेश्वर, अनखळी, अनखळी पोटा, भगवा, चिमेगाव, आजंनवाडी, नंदगाव या ठिकाणी लिलाव पद्धतीने वाळूचे धक्के अनेकांनी घेतले आहेत. पुर्णा नदीच्या पात्रामध्ये चिमेगाव, भगवा, आंजनवाडी, अनखळी, पोटा, नदिखेडा या ठिकाणी वाळूचे धक्के आहेत. मंगळवारी या भागामध्ये ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने जावून नेमका कशा पद्धतीने वाळूचा उपसा केला जातो, याची माहिती घेतली. त्यात येथील वाळूच्या धक्क्यांवर जे. सी. बीच्या सहाय्याने नदीपात्रात मोठे खड्डे करून, या खड्ड्यांमध्ये बोटींग बसविण्यात आल्या आहेत. या बोटींगद्वारे नदीपात्रातील वाळू पाईपच्या सहाय्याने मशिनद्वारे ओढून घेतली जात असल्याचे दिसून आले. ही मशिन पाईपच्या सहाय्याने चाळलेली वाळू जेसीबीच्या मदतीने टिप्पर, ट्रॅक्टरमध्ये भरून दिल्या जाते. एका टिप्परसाठी ४ हजार रुपये तर ट्रॅक्टरसाठी ८०० रुपये घेतल्या जातात. अशा प्रकारच्या बोटींग सदर प्रतिनिधीला आठ ठिकाणी दिसून आल्या. पुर्णा नदीपात्रात मशिनद्वारे वाळू उपसा करण्याचा कुठल्याही प्रकारचा परवाना या ठेकेदारांना प्रशासनाने दिला नसल्याचे समजते; परंतु उघडपणे वाळू माफीया मशिनचा वापर करीत आहेत. याकडे महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला आहे. त्यामुळे ठेकेदार क्षमतेपेक्षा जास्त वाळूचा उपसा करीत आहेत. यावर्षी विदर्भातील वाशिम, यवतमाळ, बुलडाणा, अकोला या जिल्ह्यांमध्ये वाळू घटांचे लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे या भागातील वाळू माफिये २४ तासांत वाहनांने औंढा तालुक्यातून वाळूंची वाहतूक करताना दिसून येत आहेत. वाशिम येथे मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा जमा करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. हिंगोली- औंढा राज्य रस्त्यावरून दिवसरात्र मिळून १०० पेक्षा अधिक वाळूंची वाहतुक करणारे वाहने दिसत आहेत; परंतु प्रशासन मात्र कुठलीच कारवाई करताना दिसून येत नाही. औंढा तहसीलदार शाम मदनुरकर यांनी गत महिन्यामध्ये अवैैध वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली होती.
कारण येथील एकाही वाहनांजवळ रॉयल्टी मिळून न आल्याने कारवाई करण्यात आली. तीन वेळा झालेल्या या कारवाईतून शासनाला १ लाख ५६ हजारांचा महसूल मिळाला होता. महसूल विभागाने अधीच कारवाई केल्यास वाळू माफीयांना लगाम बसू शकतो.
औंढा नागनाथ तालुक्यात वाळू घाटांचा लिलाव झाला तेंव्हापासून एकाही ठेकेदारांने नदीपात्रातील किती वाळूसाठ्याचा उपसा केला ? किती शिल्लक असल्याचा अहवाल अद्यापपर्यंत तहसील कार्यालयाला दिलेला नाही. याबाबत प्रशासनाने देखील ठेकेदारांना काही विचारणा केलेली नाही. मात्र ‘लोकमत’ प्रतिनिधीनी या बाबत तहसील कार्यालयात जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ही माहिती आमच्या कार्यालयात उपलब्ध नसल्याचे कारकून मारोती शिंदे यांनी सांगितले. औंढा तालुक्यात औंढा- जिंतूर राज्य रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात वाळूची साठवणूक करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे आंजनवाडी, नांदखेडा, जवळाबाजार, गोळेगाव, औंढा नागनाथ, शिरडशहापूर येथे देखील मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे जमा करण्यात आले आहेत.
या ठिकाणी असलेल्या लाखो ब्रास वाळूसाठ्याच्या किंमती करोडोच्या घरामध्ये आहेत. अनेक दिवसांपासून वाळू साठविली जात असताना महसूल विभाग मात्र थंड आहे. प्रशासनाकडून या अवैैधवाळू माफियांविरुद्ध कुठलीच कारवाई होतांना दिसून येत नाही. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल वाळू माफियांमुळे बुडवला जात असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)
औंढा नागनाथ तालुक्यामध्ये यंदा जडगाव, लाख, पूर, सिद्धेश्वर, अनखळी, अनखळी पोटा, भगवा, चिमेगाव, आजंनवाडी, नंदगाव या ठिकाणी लिलाव पद्धतीने वाळूचे धक्के घेतले आहेत अनेकांनी.
या भागामध्ये ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने जावून नेमका कशा पद्धतीने वाळूचा उपसा केला जातो, याची माहिती घेतली.
पूर्णा नदीपात्रात मशिनद्वारे वाळू उपसा करण्याचा कुठल्याही प्रकारचा परवाना दिला नसताना ठेकेदार उघडपणे करीत आहेत बोटीद्वारे वाळू उपसा.
औंढा तालुक्यात वाळू घाटांचा लिलाव झाला तेंव्हापासून एकाही ठेकेदारांनी नदीपात्रातील किती वाळूसाठ्याचा उपसा केला ? किती शिल्लक असल्याचा अहवाल दिलेला नाही तहसीलला.
तालुक्यातील अंजनवाडी, नांदखेडा, जवळा बाजार, शिरडशहापूर, गोळेगाव, औंढा नागनाथ येथे देखील मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे जमा करण्यात आले आहेत.

Web Title: Sand stove by boat without permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.