बंदीमध्येही वाळू उपसा

By Admin | Updated: January 4, 2016 00:17 IST2016-01-03T23:24:44+5:302016-01-04T00:17:24+5:30

व्यंकटेश वैष्णव , बीड पर्यावरण विभागाची परवानगी नसल्याने जिल्ह्यातील वाळू उपसा पूर्णत: बंद आहे. असे असतानाही वाळूमाफिया सर्रास वाळू उपसा करीत आहेत.

Sand sticks in ban | बंदीमध्येही वाळू उपसा

बंदीमध्येही वाळू उपसा


व्यंकटेश वैष्णव , बीड
पर्यावरण विभागाची परवानगी नसल्याने जिल्ह्यातील वाळू उपसा पूर्णत: बंद आहे. असे असतानाही वाळूमाफिया सर्रास वाळू उपसा करीत आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
जिल्ह्यात एकूण ११९ वाळूपट्टे आहेत. यामध्ये राक्षसभुवन, सावरगाव, छत्रबोरगाव, पंचाळेश्वर, गोंदी खुर्द, कुरणपिंप्री आदी गावांचा समावेश आहे. पर्यावरण विभागाची परवानगी नसल्याच्या कारणावरून तीन महिन्यांपूर्वीच वाळू ठेके रद्द करून कुठल्याच वाळूपट्ट्यांतून वाळू वाहतूक करू नये, असा आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्व उपविभागीय कार्यालय, तहसीलदार यांना दिलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाची पायमल्ली झाली असल्याचे चित्र वाळूपट्टा असलेल्या तालुक्यांमध्ये पाहावयास मिळते.
मध्यरात्रीच होते वाहतूक
दिवसा वाळू वाहतूक होत नाही; मात्र मध्यरात्री मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होतो. उपसा बंद असतानाही शहरातील बांधकामांना वाळू येते कुठून, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. तहसीलदार, तलाठी यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.

Web Title: Sand sticks in ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.