वाळू तस्करांची वन अधिकाऱ्याला मारहाण
By Admin | Updated: June 23, 2014 00:02 IST2014-06-22T23:45:12+5:302014-06-23T00:02:14+5:30
नांदेड :माहूर तालुक्यात पैनगंगा नदीच्या पात्रातून वाळूची तस्करी करणाऱ्या चौघांनी वनपरिक्षेत्र अधिकारी व अन्य एकाला धक्काबुक्की करुन मारहाण केल्याची घटना २० जून रोजी घडली़

वाळू तस्करांची वन अधिकाऱ्याला मारहाण
नांदेड :माहूर तालुक्यात पैनगंगा नदीच्या पात्रातून वाळूची तस्करी करणाऱ्या चौघांनी वनपरिक्षेत्र अधिकारी व अन्य एकाला धक्काबुक्की करुन मारहाण केल्याची घटना २० जून रोजी घडली़
वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बाबाराव लांबाडे व अन्य एक कर्मचारी गस्तीवर होते़ त्यावेळी पैनगंगा नदीच्या पात्रात पानधरा शिवारात पंडीत व्यवहारे व इतर तिघे वाळू चोरुन नेत होते़ यावेळी लांबाडे यांनी त्यांना पकडले असता, व्यवहारे यांनी लांबाडे यांना मारहाण करुन ट्रॅक्टर घेवून पळ काढला़
याप्रकरणी माहूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस तपास करीत आहेत़ (प्रतिनिधी)