शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

वाळू तस्कर मोकाट

By admin | Updated: May 13, 2014 00:56 IST

वैजापूर : तालुक्यात गोदावरी काठावर वाळूची साठेबाजी करून ठेवणारे वाळूमाफिया मोकाट असून वीरगाव पोलिसांना त्यांना पकडण्यात यश आले नाही.

वैजापूर : तालुक्यात गोदावरी काठावर वाळूची साठेबाजी करून ठेवणारे वाळूमाफिया मोकाट असून वीरगाव पोलिसांना त्यांना पकडण्यात यश आले नाही. माफिया फरार असल्याच्या नावाखाली पोलीस त्यांना ‘अभय’ देत असल्याचा संशय निर्माण होत आहे. तालुक्यातील गोदापात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून वाळूची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू आहे. हायवा व ट्रकसारख्या मोठ्या अवजड वाहनामधून होणार्‍या वाळू वाहतुकीमुळे तालुक्यातील गंगथडी भागातील रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांनी गंगथडी भागात जाऊन पाहणी केली असता त्यांना गोदानदीच्या काठावर अनेक अवैध वाळूसाठे आढळून आले. त्यामुळे लवांडे यांनी स्थानिक संबंधित अधिकार्‍यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सोमवारी उपविभागीय अधिकारी नारायण उबाळे, तहसीलदार डॉ. प्रशांत पडघन, वीरगाव पोलीस ठाण्याचे फौजदार सोनवणे, खनिकर्म अधिकारी, मंडळाधिकारी व तलाठी यांच्या पथकाने छापे टाकले होते. याप्रकरणी तालुक्यातील पुरणगाव येथील मधुकर ठोंबरे, रामा ठोंबरे, सूरज ठोंबरे, मनोठ ठोंबरे, मिथुन ठोंबरे, लाखगंगा येथील रमेश सोनवणे, प्रवीण तुरकणे, प्रभाकर पडवळ, बाभूळगावगंगा येथील सोपान तुरकणे, सुभाष तुरकणे, विठ्ठल तुरकणे, वाल्मीक तुरकणे, राजू बोराडे, जालिंदर कुंजीर व बाबासाहेब कुंजीर या १५ जणांविरुद्ध वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या कारवाईस आठ दिवसांचा कालावधी उलटूनही हे सर्व वाळूमाफिया अजून मोकाट आहेत. आठ दिवसांत पोलिसांना एकही आरोपी पकडण्यात यश आले नाही. पोलिसांना आरोपी पकडणे फारसे अवघड नाही; परंतु आरोपी खरेच फरारी आहे की पोलिसांनीच त्यांना फरारी घोषित केले? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर) गेल्या सोमवारी महसूल अधिकार्‍यांनी तालुक्यातील पुरणगाव, लाखगंगा व बाभूळगावगंगा येथील गोदावरी नदीच्या काठावर वाळूची साठेबाजी करून ठेवणार्‍या १५ माफियांविरुद्ध वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून धडाकेबाज कारवाई केली होती. उपविभागीय अधिकारी नारायण उबाळे, तहसीलदार डॉ. प्रशांत पडघन व महसूल विभागाच्या अन्य कर्मचार्‍यांच्या पथकाने तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर १५ ठिकाणी छापे टाकून ४३ लाख रुपये किमतीची १४४० ब्रास अवैध वाळू जप्त केली होती. या प्रकरणी १५ जणांविरुद्ध वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. वाळू जप्त झाली पण माफियांना पकडण्यात यश आलेले नाही. दरम्यान याबाबत वीरगाव ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डी. एन. रयतूवार यांच्याशी संपर्क साधला असता आरोपींचा आम्ही पुणतांबा, लाखगंगा, बाभूळगावगंगा, सावखेडगंगा, भालगाव व म्हस्की येथे शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु ते सापडत नसल्याचे त्यांनी सांगितले.