वाळू माफियांची पाण्यातून वाळू उपसा करणारी यंत्रणा उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:06 IST2021-04-09T04:06:01+5:302021-04-09T04:06:01+5:30
पैठण : पाण्यातून वाळू उपसा करण्यासाठी वाळू माफियांनी गोदावरी पात्रात लाखो रुपये खर्चून उभारलेली मध्यवर्ती यंत्रणा गुरुवारी पोलिसांनी उद्ध्वस्त ...

वाळू माफियांची पाण्यातून वाळू उपसा करणारी यंत्रणा उद्ध्वस्त
पैठण : पाण्यातून वाळू उपसा करण्यासाठी वाळू माफियांनी गोदावरी पात्रात लाखो रुपये खर्चून उभारलेली मध्यवर्ती यंत्रणा गुरुवारी पोलिसांनी उद्ध्वस्त केली. यासाठी वापरली जाणारी यारी मशीन, केणी, वायर रोप व दोरखंड पोलिसांनी जप्त केले आहे. या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
जायकवाडी धरणातून चनकवाडी बंधाऱ्यासाठी गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी पात्रात पाणी आहे. पाण्यातून वाळूचा उपसा करण्यासाठी वाळू तस्करांची यंत्रणा गेल्या चार दिवसांपासून कामाला लागली होती. जुने कावसान भागात चार ठिकाणी यारी मशीन टाकण्यात आले होते. वाळू वाहतुकीसाठी वायर रोप, दोरखंड व इतर यंत्रणा उभारण्यात आल्या होत्या. पोलिसांनी तस्करांची सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी दुपारी छापा मारला व तस्करांनी उभारलेली यंत्रणा धुळीस मिळविली.
सहायक पोलीस अधीक्षक गोरख भामरे, पो.नि. किशोर पवार, पो.उ.नि. रामकृष्ण सागडे, पो.ह. सुधीर ओव्हळ, पो.ना. करतारसिंग सिंगल, पोना. परवेज पठाण, सोमनाथ थेटे आदींच्या पथकाने ही कारवाई करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यंत्रणा मोडीत निघाल्याने तात्काळ यंत्रणा उभारणे वाळू माफियांना शक्य नाही. यामुळे काही प्रमाणात वाळू उपसा थांबणार आहे.
फोटो :
पैठण येथील गोदावरी पात्रात कारवाई करताना प्रशिक्षणार्थी आयपीएस गोरख भामरे, पोलीस निरीक्षक किशोर पवार व पोलीस पथक.
080421\sanjay ramnath jadhav_img-20210408-wa0028_1.jpg
पैठण येथील गोदावरी पात्रात कारवाई करताना प्रशिक्षणार्थी आयपीएस गोरख भामरे, पोलीस निरीक्षक किशोर पवार व पोलीस पथक.