वाळूमाफियांची महसूलच्या पथकाला धमकी
By | Updated: November 28, 2020 04:09 IST2020-11-28T04:09:14+5:302020-11-28T04:09:14+5:30
अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिशोर - सिल्लोड रस्त्यावर तलाठी दीपाली बागूल व मंडळ अधिकारी बेडवाल ...

वाळूमाफियांची महसूलच्या पथकाला धमकी
अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिशोर - सिल्लोड रस्त्यावर तलाठी दीपाली बागूल व मंडळ अधिकारी बेडवाल यांनी सदर ट्रॅक्टर थांबवून राॅयल्टीबाबत चौकशी केली. तसेच ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात घेण्याचे सांगितले. यावेळी ट्रॅक्टर चालक व मालकाने बागूल व बेडवाल यांना धमकी देऊन ट्रॅक्टरसह पोबारा केला. याबाबत तलाठी दीपाली बागूल यांनी उत्तम लक्ष्मण मोकासे व विनोद शिंदे यांच्या विरुद्ध पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.