वाळू माफिया एसपींच्या रडारवर
By Admin | Updated: July 11, 2017 00:12 IST2017-07-11T00:10:52+5:302017-07-11T00:12:52+5:30
गेवराई : पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी दुपारी २ वाजता तालुक्यातील राजापूर येथील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणारे १२ ट्रॅक्टर वाळूसह जप्त करण्यात आले.

वाळू माफिया एसपींच्या रडारवर
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी दुपारी २ वाजता तालुक्यातील राजापूर येथील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणारे १२ ट्रॅक्टर वाळूसह जप्त करण्यात आले. एकूण ५४ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला आहे.
राजापूर येथे अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांच्या पथकातील प्रमुख कैलास लहाने यांनी मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसोबत राजापूर येथील गोदावरी नदी पात्रात अवैधरीत्या वाळू उपसा करणारे १२ ट्रॅक्टर पकडले. एकूण १२ ब्रास वाळूसह ५४ लाख ३३ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पथकात पी. टी. चव्हाण, गणेश पवार, संजय चव्हाण, अनंत गिरी, देविदास घोलप, प्रवीण कुडके यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. उशिरापर्यंत तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.