शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
2
फक्त ५० मिनिटे उरली! आझाद मैदान रिकामे करा; हायकोर्टाच्या आदेशानंतर पोलीस एक्शन मोडमध्ये
3
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: २४ तासांची परवानगी, मग आता तुम्ही कोणत्या अधिकारात तिथे बसला आहात; हायकोर्टाचा सवाल
4
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
5
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
6
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
7
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
8
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
9
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
10
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
11
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
12
Ganesh Visarjan: गौरी-गणपतीच्या निरोपासाठी जय्यत तयारी
13
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
14
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
15
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट
16
Mumbai: डहाणूच्या चंद्रसागर खाडीत अवतरले पक्षीवैभव
17
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
18
मतचोरीच्या ‘ॲटम बॉम्ब’नंतर आता फुटेल ‘हायड्रोजन बॉम्ब’; राहुल गांधींचा इशारा
19
पीटर नवारोंनी पुन्हा गरळ ओकली, मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीवर केले मोठे विधान
20
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...

जलजीवनसाठीच्या वाळूची केली विक्री; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्याला ५६ कोटींचा दंड!

By विकास राऊत | Updated: July 17, 2025 16:43 IST

लोकमत इम्पॅक्ट: ठेक्यातून प्राधिकरणाने नेमलेल्या कंत्राटदारांनी १८ हजार ४८९ ब्रास वाळू जास्तीची उपसली

छत्रपती संभाजीनगर : ‘मजीप्रा’ने वॉटरग्रीड व जलजीवन मिशन योजनेच्या कामासाठी गंगापूर तालुक्यातील शिवना नदीपात्रातील सनव या राखीव वाळूपट्ट्यातून ९ हजार ६०० ब्रास वाळू उपसण्याचा ठेका ६३ लाख ६० हजार रुपयांच्या रॉयल्टीत जिल्हा प्रशासनाकडून घेतला. ठेक्यातून प्राधिकरणाने नेमलेल्या कंत्राटदारांनी १८ हजार ४८९ ब्रास वाळू जास्तीची उपसली असून, दंडात्मक कारवाईसह ५६ कोटी रुपयांची ही वाळू असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंत्यांना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दंड लावण्याचे आदेश बुधवारी दिले. शासकीय संस्थेतील अभियंत्याला एवढा मोठा दंड लावण्याची राज्यातील ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.

‘लोकमत’ने ४ व ५, ६ जूनच्या अंकात महसूल यंत्रणेला प्राधिकरणाने कसे गंडविले आहे, याचे बिंग फोडल्यानंतर महसूल प्रशासन यंत्रणा जागी झाली. ४ जून रोजी १ मीटरपेक्षा जास्तीचे उत्खनन झाल्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांनी एसडीएम संतोष गरड व पथकाला घेऊन छापा मारल्यानंतर समोर आले. त्यानंतर मंडळाधिकारी, तलाठी यांना निलंबित केले. गंगापूर तहसीलदार नवनाथ वाघवाड, उपविभागीय अधिकारी अरुण जऱ्हाड यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले.

कंत्राटदाराकडून दंड वसूल करणार, अपिलात जाणारप्राधिकरणाला ९६०० ब्रास वाळू हवी होती. तेवढी उपसल्यानंतर ठेका बंद करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंत्यांची होती. प्राधिकरणाने यंत्रणा नसल्यामुळे एका कंत्राटदाराला वाळू उपसण्याचे कंत्राट दिले. त्याने दुसऱ्याला दिल्याचे रेकॉर्ड नाही. हे फक्त प्राधिकरण अभियंत्यांना माहिती होते. दरम्यान, प्राधिकरण या दंड आदेशाविरोधात विभागीय आयुक्तांकडे अपील करणार आहे, तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी लावलेला दंड वॉटरग्रीड व जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांच्या बिलातून वसूल करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काय आहे नोटिसीत?अवैधरीत्या वाळू उत्खनन केल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंत्यांकडून ५६ कोटी ६८ लाख ७२ हजार ७४० रुपये दंड वसूल करण्याचे आदेश दिले. त्यांनी दंड वसुलीची रक्कम शासनखाती भरून त्याची प्रत सादर करावी. दंडाची रक्कम शासन खाती जमा करून चालानची मूळ प्रत सादर न केल्यास शासकीय वसुली प्रमाणपत्राद्वारे वसूल करण्यात येईल.

उत्खननाचे ठिकाण : सनव गट क्र.१०२, १०३, १०४, १०५, १०९, ११०, ११७, ११८परवानगी : ९५४० ब्रासझालेले उत्खनन : २८०३२ ब्रासअतिरिक्त उत्खनन : १८४८९ ब्रासप्रतिब्रास बाजारमूल्य : ६ हजार रुपयेपाचपट दंडासह : ५५ कोटी ४६ लाख ७० हजार डीएमएफसह दंड आकारणी : ५६ कोटी ६८ लाख ७२ हजार ७४० रुपये.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीsandवाळू