शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांवर ‘संक्रांत’!

By admin | Updated: December 14, 2014 00:19 IST

बीड : शहरामधील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा गंभीर बनत चालला आहे. ज्यांनी अनाधिकृत बांधकाम केले आहेत, असे सर्व लोक हे बडे हस्ती आहेत.

बीड : शहरामधील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा गंभीर बनत चालला आहे. ज्यांनी अनाधिकृत बांधकाम केले आहेत, असे सर्व लोक हे बडे हस्ती आहेत. आणि आता कोणाचीही गय केली जाणार नसून या बड्या हस्तींपासूनच गुन्हे दाखल करायला सुरूवात होणार आहे. आठ दिवसांत ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. नोटीस पाठवूनही गांभीर्याने न घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता अनधिकृत बांधकामधारकांवर ‘संक्रात’ येणार आहे.मुख्याधिकारी म्हणून श्रीकृष्ण भालसींग रुजू झाले, आणि पालिकेतील वातावरणच ‘स्ट्रीक्ट’ झाले. पुर्वी कर्मचाऱ्यांना ना कोणाचा धाक होता ना दोरा. त्यामुळे पालिकेत सर्व कर्मचाऱ्यांच्या मनावरच कारभार चालतो. त्यामुळे पालिकेचे नियोजन पुर्णत: ढेपाळले होते. वरीष्ठांचे दुर्लक्ष होत असल्यानेच कर्मचारी कार्यालयातून पसार व्हायचे. मात्र आता परिस्थिती पुर्णत: बदलली आहे. कर्मचाऱ्यांनी वेळेवर कार्यालयात येण्याबरोबरच कामांचा आढावा रोजची रोज घेतला जात आहे.सध्या शहरात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे करून रस्ते ढापण्याचा प्रयत्न बड्या हस्तींनी केलेला आहे. याचे उत्तम उदाहरणेही पालिकेला दाखवून दिलेले आहेत. पालिकेतील संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात पाहणी न करताच बांधकाम परवाने दिले. ज्या ठिकाणी अनाधिकृतपणे बांधकामे सुरू आहेत, अशांवर कारवाई करण्यासह पालिकेने कठोर उचलेले नव्हते. या सर्व परिस्थितीची आढाव घेऊन ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी अनाधिकृत बांधकाम धारकांना नोटीसा बजावल्या होत्या. त्यामुळे अनाधिकृत बांधकाम धारकांच्या पायाखालची वाळूच सरकली होती. आता पुन्हा एकदा मोठा ‘हाबाडा’ मुख्याधिकारी भालसिंग यांनी दिला आहे. त्यामुळे पालिकेतील अभय देणाऱ्या कर्मचाऱ्यांसह अनाधिकृतपणे बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)४एखाद्यावर नियमाचे उल्लंघन करूनही गुन्हे दाखल करणे म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी मोठे आव्हान असते. कारण प्रत्येकाला बीडमधील ‘दादा’, भैय्या, आण्णा, जिजाचे अभय असते. अधिकारी ज्यावेळेस कारवाया करायला निघतात, त्यावेळेस राजकीय पुढाऱ्यांमार्फत अधिकाऱ्यांवर दबाव आणून कारवाई अडचणी आणल्या जातात. सध्याही अनधिकृतपणे बांधकाम केलेल्या अनेकांना राजकीय पुढाऱ्यांचे अभय आहे. त्यामुळे हे गुन्हे दाखल करणे भालसिंग यांच्यापुढे मोठे आव्हान असणार आहे़