‘समाजकल्याण’च्या ३३.४६ कोटीच्या ६९४ कामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:05 IST2021-06-11T04:05:12+5:302021-06-11T04:05:12+5:30
औरंगाबाद : जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या बैठकीत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक वस्ती विकास योजनेच्या २०२०-२१ मधील मिळालेल्या ३३ ...

‘समाजकल्याण’च्या ३३.४६ कोटीच्या ६९४ कामांना मंजुरी
औरंगाबाद : जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या बैठकीत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक वस्ती विकास योजनेच्या २०२०-२१ मधील मिळालेल्या ३३ कोटी ४६ लाखाच्या निधीतून ६९६ विविध विकास कामांना अखेर मंजुरी मिळाली. तसेच २०२१-२२ साठी ३० कोटींचा निधी मंजूर झाला असून त्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
जि. प. समाजकल्याण समिती सभापती मोनाली राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मंजूर ३३.४६ लाख रुपयांच्या विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली.
चौकट...
औरंगाबाद तालुक्याला सर्वाधिक निधी
तालुुका कामे निधी
औरंगाबाद - १३६ कामे - ६ कोटी ८९ लाख,
कन्नड - ८४ कामे ४ कोटी ४७ लाख,
सोयगाव- ३७ कामे - १ कोटी ९२ लाख,
सिल्लोड - ७६ कामे - ३ कोटी ६२ लाख,
पैठण - ९४ कामे - ४ कोटी ३१ लाख,
गंगापूर - १०६ कामे - ५ कोटी १० लाख,
वैजापूर- ८१ कामे ३ कोटी ६० लाख
फुलंब्री - ४६ कामे- २ कोटी ३४ लाख ५० हजार
खुलताबाद - ३४ कामे - १ कोटी ५० लाख