लोकमत सखी मंचचा ‘संक्रातोत्सव’ कार्यक्रम

By Admin | Updated: February 10, 2016 00:18 IST2016-02-09T23:53:59+5:302016-02-10T00:18:36+5:30

बीड : लोकमत सखी मंचच्या वतीने येथे १२ फेबु्रवारी रोजी महिलांसाठी खास ‘संक्रातोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हळदी- कुंकू व विविध स्पर्धा पार पडणार आहेत.

'Sanchatotsav' program of Lokmat Sakhi Forum | लोकमत सखी मंचचा ‘संक्रातोत्सव’ कार्यक्रम

लोकमत सखी मंचचा ‘संक्रातोत्सव’ कार्यक्रम

बीड : लोकमत सखी मंचच्या वतीने येथे १२ फेबु्रवारी रोजी महिलांसाठी खास ‘संक्रातोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हळदी- कुंकू व विविध स्पर्धा पार पडणार आहेत.
शहरातील सहयोगनगर भागातील श्री. गजानन महाराज मंदिरात हा कार्यक्रम दुपारी ४ ते सायंकाळी ७ या दरम्यान पार पडणार आहे. सखी मंच सदस्यांसोबतच सदस्य नसलेल्या महिलांनाही हळदी- कुंकू कार्यक्रमाचा लाभ घेता येईल.
याप्रसंगी महिलांच्या विविध कला- गुणांना वाव देण्यासाठी संगीत खुर्ची, एका मिनिटात विनोदी उखाणे, उत्कृष्ट वेशभुषा स्पर्धा, मनोरंजनात्मक खेळ आदी कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
संक्रातोत्सव या कार्यक्रमास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सखी मंचच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ७२७६७६३०६७. (प्रतिनिधी)

Web Title: 'Sanchatotsav' program of Lokmat Sakhi Forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.