शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’च्या कंत्राटदाराला 328 कोटी रुपये दंड भरावाच लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 07:08 IST

अवैध गौण खनिज उत्खनन; खंडपीठाने फेटाळल्या तीनही याचिका

ठळक मुद्देजालना-औरंगाबाद दरम्यानच्या समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी मेसर्स मॉन्टे कार्लो कंपनी लिमिटेड यांना कंत्राट देण्यात आले आहे. जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी उत्खननासाठी परवानगी दिली होती

औरंगाबाद : समृद्धी महामार्गाचे कंत्राटदार मेसर्स  मॉन्टे कार्लो लि.  यांना अवैध गौण खनिज उत्खनन केल्याबाबत जालन्याचे तहसीलदार यांनी  ठोठावलेल्या ३२८ कोटी  रुपयांच्या दंडाविरुद्ध कंत्राटदार संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद  खंडपीठात दाखल केलेल्या तीन वेगवेगळ्या याचिका  न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी बुधवारी फेटाळल्या. यासंदर्भात  खंडपीठाने यापूर्वी दिलेली अंतरिम स्थगिती उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करेपर्यंत कायम ठेवण्याची कंपनीची  विनंतीसुद्धा खंडपीठाने अमान्य केली. परिणामी कंपनीला ३२८ कोटी रुपये दंड भरावाच लागणार आहे.

जालना-औरंगाबाद दरम्यानच्या समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी मेसर्स मॉन्टे कार्लो कंपनी लिमिटेड यांना कंत्राट देण्यात आले आहे. जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी उत्खननासाठी परवानगी दिली होती. परंतु, मॉन्टे कार्लो कंपनीने अवैधरीत्या गौण खनिजाचे उत्खनन, वापर, वाहतूक व साठवणूक केल्याचे आढळले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शासनाचा महसूल बुडाला अशी तक्रार बदनापूरचे  माजी आमदार संतोष सांबरे यांनी जालन्याच्या  जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली होती. समितीने उत्खनन केलेल्या स्थळांची पाहणी केली असता कंपनीने परवानगी नसलेल्या जालना व बदनापूर तालुक्यांच्या हद्दीतील गटामधून अवैधरीत्या गौण खनिजाचे उत्खनन करून वापर व साठवणूक केल्याचे आढळले होते. 

कंपनीने दाखल केली थेट खंडपीठात याचिकामूळ तक्रारदार माजी आमदार  सांबरे यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, तहसीलदारांच्या आदेशाविरुद्ध कंपनीने महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याच्या कलम २४७ अन्वये  जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल करावयास हवे होते. परंतु, कंपनीने थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे या याचिका फेटाळाव्यात, अशी विनंती केली. सुनावणीअंती  खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिले.

तहसीलदारांनी ठोठावला होता दंड  दिलेल्या परवानगीच्या मर्यादेपेक्षा कंपनीने जास्त गौण खनिजाचे उत्खनन केल्याच्या समितीच्या अहवालावरून तहसीलदारांनी मॉन्टे कार्लो  कंपनीला १६५ कोटी, ८७ कोटी व ७७ कोटी अशा तीन टप्प्यांत एकूण ३२८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. तहसीलदारांनी ठाेठावलेल्या दंडाविरुद्ध  कंपनीने तीन वेगवेगळ्या याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केल्या होत्या. 

टॅग्स :Courtन्यायालयSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना