शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद-पुणे महामार्गाच्या भूसंपादनासाठी समृद्धी पॅटर्न, चार महिन्यात प्रक्रिया पूर्ण करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 19:46 IST

औरंगाबाद ते पुणे या महामार्गाच्या भूसंपादनासाठी अधिसूचना ३ (ए) निघाली असून औरंगाबाद तालुक्यातील ७ तर पैठण तालुक्यातील १७ गावांतून मार्ग जाणार आहे.

औरंगाबाद: औरंगाबाद ते पुणे या महामार्गासाठी प्राथमिक अधिसूचना निघाली असून जिल्ह्यातील २४ गावांतून या मार्गासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या समन्वयातून समृद्धी महामार्गाच्या पॅटर्ननुसार भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी बुधवार, १५ डिसेंबर रोजी अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नाडे यांच्या उपस्थितीत प्राथमिक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. जी-२० च्या नियोजन बैठकीत सगळे अधिकारी असल्यामुळे भूसंपादनाची बैठक औपचारिकच ठरली.

चार महिन्यांत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रस्ते विकास महामंडळाकडे समन्वयाची जबाबदारी त्यासाठीच देण्यात आली आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासन भूसंपादनासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करील. बुधवारच्या बैठकीला प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नाडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीकडे पाठ फिरवल्यामुळे भूसंपादन प्रक्रियेत जिल्हा प्रशासन आणि एमएसआरडीसीमध्ये बेबनाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भूसंपादन प्रक्रियेशी निगडित सर्व घटकांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले होते.

दुसरीकडे नॅशनल हाव, नारायणगाव, करंजखेडा, आखतवाडा, वाघाडी, दडेगाव जहाँगीर, पोटगाव, सायगाव, पैठण परिसरातून रस्ता जाणार आहे.यवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाकडेही स्वतंत्र भूसंपादन अधिकारी आहे. जिल्हा प्रशासन, एमएसआरडीसी आणि एनएचएआय या तीन यंत्रणात भूसंपादनावरून आगामी काळात प्रतिष्ठेचा मुद्दा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

२४ गावांतून जाणार रस्ताऔरंगाबाद ते पुणे या महामार्गाच्या भूसंपादनासाठी अधिसूचना ३ (ए) निघाली असून औरंगाबाद तालुक्यातील ७ तर पैठण तालुक्यातील १७ गावांतून मार्ग जाणार आहे. भारतमाला टप्पा-२ मध्ये ग्रीनफिल्डमध्ये हा मार्ग प्रस्तावित आहे. औरंगाबाद तालुक्यातील पीरवाडी, हिरापूर, सुंदरवाडी, झाल्टा, आडगाव बुद्रूक, चिंचोली, घारदोन तर पैठण तालुक्यातील वरवंडी खुर्द, पारगाव, डोणगाव, बालानगर, कापूसवाडी, वडाळा, बवा, वरुडी बुद्रूक, पाचळगाव, नारायणगाव, करंजखेडा, आखतवाडा, वाघाडी, दडेगाव जहाँगीर, पोटगाव, सायगाव, पैठण परिसरातून रस्ता जाणार आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPuneपुणेhighwayमहामार्ग