प्रभाग ११ मध्ये राकाँचे समीर शेख विजयी
By Admin | Updated: June 18, 2016 00:56 IST2016-06-18T00:46:21+5:302016-06-18T00:56:44+5:30
लातूर : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ ब मधील पोटनिवडणूकीचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला असून, राष्ट्रवादीचे समीर शेख यांना विजयी घोषीत करण्यात आले आहे़

प्रभाग ११ मध्ये राकाँचे समीर शेख विजयी
लातूर : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ ब मधील पोटनिवडणूकीचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला असून, राष्ट्रवादीचे समीर शेख यांना विजयी घोषीत करण्यात आले आहे़
प्रभाग क्रमांक ११ ब मधील नगरसेवक विक्रमसिंह चौहान यांनी राजीनामा दिल्यामुळे १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक झाली होती़ या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीचे दयानंद कलशेट्टी, शिवसेनेचे वैभव बिराजदार आणि राष्ट्रवादीचे समीर शेख यांच्यात लढत झाली़ १८ एप्रिल रोजी मतमोजणीही घेण्यात आली होती़ मात्र मतदार यादीत घोषीत करण्यात आलेल्या २८५ मतांवर शिवसेनेचे वैभव बिराजदार यांनी आक्षेप घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती़ त्यामुळे न्यायालयाने निकाल राखीव ठेवला होता़ दरम्यान, या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शुक्रवारी अंतिम सुनावणी झाली़ आक्षेप घेण्यात आलेल्या मतांची मतमोजणी करू नये असा निर्णय दिला़ राष्ट्रवादीचे समीर शेख यांना ही २८५ मते वगळून १५२ मतांची आघाडी होती़ त्यामुळे त्यांना न्यायालयाने विजयी म्हणून घोषीत केले आहे.