एकाच ग्राहकाशी, एकाच दिवशी, दोनदा ‘अ‍ॅडजस्टमेंट’

By Admin | Updated: May 9, 2017 23:39 IST2017-05-09T23:32:53+5:302017-05-09T23:39:12+5:30

उदगीर : केवळ आठ दिवसांत ३९ लाख रुपयांच्या ‘अ‍ॅडजस्टमेंट’ची खैरात करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी एकाच ग्राहकाला, एकाच दिवशी दोन-दोनदा सवलत दिल्याचे समोर आले आहे़

With the same customer, twice in a single day, 'Adjustment' | एकाच ग्राहकाशी, एकाच दिवशी, दोनदा ‘अ‍ॅडजस्टमेंट’

एकाच ग्राहकाशी, एकाच दिवशी, दोनदा ‘अ‍ॅडजस्टमेंट’

चेतन धनुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उदगीर : केवळ आठ दिवसांत ३९ लाख रुपयांच्या ‘अ‍ॅडजस्टमेंट’ची खैरात करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी एकाच ग्राहकाला, एकाच दिवशी दोन-दोनदा सवलत दिल्याचे समोर आले आहे़ अशा तीन संस्थांचा यात समावेश आहे़
देवणी तालुक्यातील बील व मीटरच्या गडबडीपोटी येथील अधिकाऱ्यांनी केलेली ‘अ‍ॅडजस्टमेंट’ सध्या महावितरणमध्ये चर्चेचा विषय बनला आहे़ ५५७ ग्राहकांना ३८ लाख ९३ हजार ३०७ रुपयांच्या तडजोडीचा लाभ अवघ्या १२ दिवसांच्या कालावधीत देण्यात आला आहे़ या यादीत १० हजारांपेक्षा जास्त तडजोड रक्कम असणाऱ्या ग्राहकांची संख्या १०८ इतकी आहे़ तर एकाच संस्थेस एकाच दिवशी दोन वेळा तडजोडीचा लाभ दिल्याचेही समोर आले आहे़ यामध्ये सर्वात मोठी रक्कम अलाहाबाद बँकेच्या व्यवस्थापकांच्या नावे आहे़ ३ जानेवारी रोजी त्यांच्या नावे ३५ हजार ४१ रुपये व ५२ हजार ७४४ रुपयांची अ‍ॅडजस्टमेंट रक्कम दोन तुकड्यात टाकण्यात आली आहे़ त्यापाठोपाठ याच दिवशी कुबेर
(अधिक वृत्त हॅलो/२ वर)

Web Title: With the same customer, twice in a single day, 'Adjustment'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.