शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
2
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
3
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
4
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
5
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
6
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
7
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
8
ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...
9
बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
10
Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?
11
बिहारमध्ये २०१० च्या इतिहासाची पुनरावृत्ती; नितीश कुमार अन् भाजपाने पुन्हा केली जबरदस्त कमाल
12
...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
13
टायर किंग एमआरएफची दमदार कामगिरी; प्रत्येक शेअरवर मिळणार इतका लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
14
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
15
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! ५ विकेट्सचा डाव साधत सेट केले अनेक विक्रम
16
भरला संसार विस्कटून टाकला! आधी पत्नी अन् तीन मुलांना संपवलं; नंतर स्वतःचाही जीव घेतला
17
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
18
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
19
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
20
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

Samaruddhi Accident: देवदर्शनाला जाताना सख्ख्या बहिणींसह दोन सुना, मुलगा-नातीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 13:29 IST

नळाचे पाणी भरण्यासाठी दोन्ही कुटुंबप्रमुख थांबले होते घरी

छत्रपती संभाजीनगर : शेगावला देवदर्शनासाठी निघालेल्या सख्ख्या बहिणी हौसाबाई बर्वे व प्रमिला बोरुडे या दोघींचा मृत्यू समृद्धी महामार्गावर मेहकरनजीक झालेल्या भीषण अपघातात झाला. या अपघातात हौसाबाई यांची सून श्रद्धा व नात जान्हवी, तर प्रमिला यांचा मुलगा किरण आणि सून भाग्यश्री यांचाही मृत्यू झाला आहे.

जखमी सात जणांवर शहरातील सिटिकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या सर्वांना रुग्णालयात दाखल करताच शेकडो आप्तस्वकीयांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. बर्वे कुटुंब हडकोतील एन ११ मध्ये राहते तर बोरुडे कुटुंब एन ९ हडकोमध्ये राहते. दोन्ही कुटुंबांचा लॉण्ड्रीचा व्यवसाय आहे. रवींद्र हे बर्वे कुटुंबाचे तर त्याचे काका (मावसा) राजेंद्र हे बोरुडे कुटुंबाचे प्रमख आहेत. या दोन्ही कुटुंबांनी शेगाव येथील गजानन महाराज यांच्या दर्शनाला जाण्यासाठी दोन गाड्या केल्या होत्या. मात्र, महापालिकेच्या नळाला शनिवारी पाणी येणार होते, ते न आल्यामुळे रवींद्र व राजेंद्र हे कुटुंबप्रमुख पाणी भरण्यासाठी पाठीमागे थांबले. त्यांनी एका कारमध्ये रविवारी पहाटे सहा वाजता दोन्ही कुटुंबांतील १२ जण आणि भाचीला पुढे पाठवून दिले. समृद्धी महामार्गावर मेहकर- सिंदखेडराजादरम्यान लोणार तालुक्यातील शिवणी पिसाजवळ सकाळी ८ वाजता कारने चार पलट्या मारल्या. 

यामध्ये १३ जण सर्व बाजूंना फेकले गेले. त्यातील रवींद्र यांची भाची वैष्णवी गायकवाड ही गंभीर जखमी झाली होती. ती शुद्धीवर आल्यानंतर तिने उपस्थित पोलिसांना तिच्या आईचा मोबाइल नंबर सांगितला. त्यावर फोन करून पोलिसांनी अपघाताची माहिती दिली. त्यानंतर शहरातून अनेकजण मेहकरच्या दिशेने रवाना झाले. ताेपर्यंत मेहकर ग्रामीण रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर सात जणांना छत्रपती संभाजीनगरला पुढील उपचारासाठी हलविले. या जखमींमध्ये कुटुंबप्रमुख रवींद्र यांची पत्नी नम्रता, मुले रुद्र, यश आणि सौम्य यांच्यासह भाऊ सुरेश, पुतण्या जतीन आणि भाची वैष्णवी असे सातजण होते. जखमीतील रुद्रची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

चार वर्षांचा मुलगा आईला पोरकाया अपघातात श्रद्धा बर्वे यांच्यासह त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. त्यांचा पती सुरेश व चार वर्षांचा मुलगा जतीन गंभीर जखमी आहेत. आईच्या मृत्यूमुळे चार वर्षांचा जतीन पोरका झाला आहे.

किरण-भाग्यश्रीचे वर्षभरापूर्वी लग्नअपघातातील मृत किरण बोरुडे व भाग्यश्री बोरुडे या दोघांचे लग्न वर्षभरापूर्वीच झाले होते. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. या दोघांना मूल नव्हते. या दोघांसह किरणची आई प्रमिला यांचाही अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे बोरुडे कुटुंबात आता कुटुंबप्रमुख राजेंद्र बोरुडे व हवाईदलात असलेला मुलगा तुषार हे दोघेजणच राहिल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. तुषार हा महिनाभरापूर्वीच सुटीवरून विशाखापट्टणमला ड्युटीवर गेला होता. तो घटनेची माहिती समजताच शहराच्या दिशेने निघाला आहे.

आई, मावशी गेल्याचे समजताच फोडला हंबरडाअपघातातील जखमींना उस्मानपुरा येथील सिटीकेअर हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर जखमी वैष्णवीची आई दवाखान्यात पोहोचली. त्यांना इतर जखमींवर जालना येथे उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, काही वेळाने आईसह मावशी, दोन भावजया, मावसभाऊ आणि भाची मृत झाल्याचे समजताच त्यांनी मोठ्याने हंबरडा फोडला. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जमलेल्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्याचे दिसून आले.

अप्तस्वकीयांची हॉस्पिटलमध्ये गर्दीउस्मानपुऱ्यातील हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू असल्यामुळे बर्वे, बोरुडे कुटुंबाच्या नातेवाईक, मित्र, गल्लीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. माजी महापौर बापू घडामोडे, माजी नगरसेवक राजगौरव वानखेडे, स्वाती नागरे, राजेंद्र इंगळे, कचरू घोडके यांच्यासह परीट (धोबी) समाज संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र सोनवणे, रामदास शिंदे, रामनाथ बोर्डे, अशोक दामले, कैलास निकम, शिवाजी लिंगायत, उज्ज्वल शिंदे, गणेश मुळे, मनोज शिरसाट यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात