समाजवादी पार्टीचा रास्तारोको

By Admin | Updated: June 26, 2014 00:42 IST2014-06-26T00:35:55+5:302014-06-26T00:42:13+5:30

हिंगोली : समाजवादी पार्टीच्या वतीने विविध मागण्यांसाठी हिंगोली येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

Samajwadi Party's Rastaroko | समाजवादी पार्टीचा रास्तारोको

समाजवादी पार्टीचा रास्तारोको

हिंगोली : समाजवादी पार्टीच्या वतीने विविध मागण्यांसाठी हिंगोली येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
कनेरगाव - हिंगोली व हिंगोली - वारंगाफाटा या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, सेनगाव तालुक्यात रेशनचे धान्य व रॉकेलच्या होणाऱ्या काळा बाजारास आळा घालून चौकशी करण्यात यावी, हिंगोली शहरातील सिमेंट रस्त्याचे काम मंदगतीने होत असल्याने या प्रकाराची चौकशी करावी, २०१०-११ मध्ये व आजतागायत मग्रारोहयोंतर्गत अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करूनही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही.त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, शहरात डांबरीकरणाचे निकृष्ट काम सुरू आहे, या प्रकाराची चौकशी करावी यासह अन्य विविध मागण्यांसाठी समाजवादी पार्टीच्या वतीने बुधवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष शेख नईम शेख लाल, महासचिव तौफिक अहेमद, उपाध्यक्ष रवि जयस्वाल, डॉ. सरफराज खान, बासित शेख, मुनाफ शेख, मो. आयुब, मौलाना अमीन शेख, जमील शेख, मो. मोबीन, इरशाद पठाण, फेराज पठाण आदींनी सहभाग नोंदविला. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Samajwadi Party's Rastaroko

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.