‘देशा’ व ‘पौळ्या’ बैलजोडीची समाधी...

By Admin | Updated: September 1, 2016 01:14 IST2016-09-01T00:47:57+5:302016-09-01T01:14:24+5:30

गोविंद इंगळे , निलंगा घरच्याच गायीची दोन पारडे ‘देशा’ व ‘पौळ्या’ या जोडीने सलग २५ वर्षे शेतीत काबाड कष्ट करून शेतीला साथ दिली. त्यामुळेच मला वैभव प्राप्त झाले

Samadhi of 'Country' and 'Poula' Baljodi ... | ‘देशा’ व ‘पौळ्या’ बैलजोडीची समाधी...

‘देशा’ व ‘पौळ्या’ बैलजोडीची समाधी...


गोविंद इंगळे , निलंगा
घरच्याच गायीची दोन पारडे ‘देशा’ व ‘पौळ्या’ या जोडीने सलग २५ वर्षे शेतीत काबाड कष्ट करून शेतीला साथ दिली. त्यामुळेच मला वैभव प्राप्त झाले. त्यांच्या मृत्यूनंतर समाधी बांधून नित्यनेमाने दर्शन घेतो. या ‘देशा’ व ‘पौळ्या’तच मी माझा देव पांडुरंग पाहिला असल्याची भावना पोळा सणानिमित्त शेतकरी सत्यनारायण पाटील यांनी व्यक्त केली. ‘देशा’ व ‘पौळ्या’च्या आठवणीने त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
निलंगा तालुक्यातील शिवणी (को.) येथील शेतकरी सत्यनारायण पाटील यांच्याकडे वडिलोपार्जित २२ एकर जमीन आहे. १९९४ ला बारावीचे शिक्षण घेत असताना शेती व जनावरांच्या प्रेमापोटी शाळा सोडली. घरातीलच २०-२२ जनावरे राखण्याचे काम ते करू लागले.
घरातील जनावरे विकायची नाहीत. दुभत्या जनावरांचे दूधही विकायचे नाही, हा वडिलोपार्जित वसा घेऊन शेतीवर काम करू लागले. ‘देशा’ व ‘पौळ्या’ ही दोन पारडेही घरच्याच गायीची. ३० वर्षांपूर्वी शेतात कामाला जुंपलो. रात्री-बेरात्री या दोघासोबत असताना कधी कसली भीतीही वाटली नाही. या ‘देशा’ व ‘पौळ्या’च्या साथीमुळे शेतीतील उत्पन्नातही मोठी भर पडली. मला वैभव प्राप्त झाले.
तब्बल २५ वर्षे मला साथ दिलेल्या देशा व पौळ्या या बैलजोडीचे निधन झाले. या दोघांत दिसणाऱ्या माझ्या देवाची मी माझ्या शेतात समाधी बांधली. त्या समाधीचे दर्शन घेऊनच शेतातील कामास सुरुवात करीत असल्याचे सांगून सत्यनारायण पाटील यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

Web Title: Samadhi of 'Country' and 'Poula' Baljodi ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.