पोलीस दलातर्फ हुतात्म्यांना मानवंदना
By Admin | Updated: October 22, 2016 00:31 IST2016-10-22T00:15:40+5:302016-10-22T00:31:15+5:30
जालना : गेल्या वर्षभरात देशभरात हुतात्मा झालेल्या पोलिसांना शुक्रवारी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस परेड मैदान येथे श्रद्धांजली वाहून मानवंदना देण्यात आली.

पोलीस दलातर्फ हुतात्म्यांना मानवंदना
जालना : गेल्या वर्षभरात देशभरात हुतात्मा झालेल्या पोलिसांना शुक्रवारी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस परेड मैदान येथे श्रद्धांजली वाहून मानवंदना देण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर उपस्थित होते.
सकाळी साडेसात वाजता पोलीस कवायत मैदान येथे आयोजित कार्यक्रमात २२ आॅक्टोबर ते २० आक्टोबर या कालावधीत देशभरातील विविध घटनांमध्ये शहीद झालेल्या पोलीस दलातील जवानांना मानवंदना देण्यात येते. यावेळी त्यांनी केलेल्या कार्य आणि त्याच्या नावाचे वाचन करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जोंधळे यांनी यावेळी हुतात्मांना श्रद्धांजली वाहून मानवंदना दिली. यावेळी पोलिसांनी हवेत फैरी झाडून सलामी दिली.
यावेळी राज्य राखीव दलाचे संभाजी कदम, सहाय्यक समादेशक मेटकर, गृह शाखेचे पोलिस उपअधीक्षक अभय देशपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस निरीक्षक योगेश गावडे, पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख आदीसह पोलीस कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विशेष अपवाद वगळता या कार्यक्रमाकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)