पोलीस मुख्यालयात हुतात्म्यांना मानवंदना
By Admin | Updated: October 22, 2016 00:36 IST2016-10-22T00:18:32+5:302016-10-22T00:36:00+5:30
लातूर : पोलिस स्मृतिदिनानिमित्त बाभळगाव येथील जिल्हा पोलीस मुख्यालयात शुक्रवारी सकाळी पोलीस हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली.

पोलीस मुख्यालयात हुतात्म्यांना मानवंदना
लातूर : पोलिस स्मृतिदिनानिमित्त बाभळगाव येथील जिल्हा पोलीस मुख्यालयात शुक्रवारी सकाळी पोलीस हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड, अपर पोलीस अधीक्षक लता फड, बाभळगावच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य कालिदास सूर्यवंशी, पोलीस उपाधीक्षक रमेश कंतेवार, औशाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांची उपस्थिती होती. वर्षभरात देशातील सर्व राज्यांत पोलीस दलाचे ६० अधिकारी व ४१४ पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. त्यात महाराष्ट्राच्या ५ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राखीव दलाचे पोलीस निरीक्षक जी.बी. चंदनशिवे यांच्या पथकाने शहिदांना शोकसलामीसह मानवंदना दिली.
यावेळी पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)