खाराकुंआत विहीर नव्हे, निघाले तळघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2017 00:28 IST2017-06-07T00:25:56+5:302017-06-07T00:28:21+5:30

औरंगाबाद : खाराकुंआमध्ये ऐतिहासिक विहिरीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी उत्खनन करण्यात आले; पण तिथे विहीर नसून तळघर असल्याचे आढळून आले आहे

Saline is not good, but the basement is not there | खाराकुंआत विहीर नव्हे, निघाले तळघर

खाराकुंआत विहीर नव्हे, निघाले तळघर


लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : खाराकुंआमध्ये ऐतिहासिक विहिरीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी उत्खनन करण्यात आले; पण तिथे विहीर नसून तळघर असल्याचे आढळून आले आहे. चुनखडी, शिसे मिसळून तयार करण्यात आलेले हे भक्कम बांधकाम २० ते २२ फूट खोल आहे. विशेष म्हणजे या तळघरात गेल्यावर थंडगार वाटते. या तळघराविषयी स्थानिक नागरिकांमध्ये वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे. या तळघराचा वापर नेमका कशासाठी केला जात होता, याचे गूढ रहस्य यामुळे आणखी वाढले आहे.
महापालिकेने १९९२ सालच्या विकास आराखड्यामध्ये खाराकुंआ भागात तत्कालीन भू-विकास बँक असलेल्या ९ हजार चौरस मीटर जागेवरील जुन्या इमारतीत (देवडी) क्रीडांगणाचे आरक्षण झाले. ही जागा पालिकेच्या मालकीची असून, तेथे क्रीडांगण करण्यासाठी मार्च २०११ मध्ये जुनी इमारत पाडण्याचे काम हाती घेण्यात आले होते.

 

Web Title: Saline is not good, but the basement is not there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.