विक्रीकर बुडव्यांना मुंबईत पकडले
By Admin | Updated: September 19, 2014 00:27 IST2014-09-19T00:25:31+5:302014-09-19T00:27:03+5:30
हिंगोली : दोन वर्षांपूर्वी कागदोपत्री मालाची खरेदी-विक्री केल्याचे दाखवून ३७ लाखांचा विक्रीकर बुडवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला

विक्रीकर बुडव्यांना मुंबईत पकडले
हिंगोली : दोन वर्षांपूर्वी कागदोपत्री मालाची खरेदी-विक्री केल्याचे दाखवून ३७ लाखांचा विक्रीकर बुडवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील दोन आरोपींना मुंबईत येथे अटक करून गुरूवारी हिंगोलीत आणण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली आहे.
याबाबत नांदेड विभागाचे तत्कालीन विक्रीकर सहआयुक्त पी.के. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक विक्रीकर आयुक्त एकनाथ पावडे यांनी २४ जुलै २०१२ रोजी हिंगोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होतीे. त्यावरून दोन आरोपींविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्यातील आरोपींचा माग काढून त्यांना बुधवारी मुंबईत पकडण्यात आले. पोलीस उपअधिक्षक सुनील लांजेवार, पोनि सतीशकुमार टाक यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विवेक सोनवणे, पोना अनिल भारती यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यात आरोपी राहुल गर्जेंद्र पांचाळ (३३), मोहन रघुनाथ मोरे (३५ दोघे रा.मुंबई) यांना अटक झाली आहे. (प्रतिनिधी)