पहिल्याच दिवशी ८८४ अर्जांची विक्री
By Admin | Updated: April 1, 2015 01:05 IST2015-04-01T00:23:43+5:302015-04-01T01:05:33+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज पहिल्याच दिवशी १० ठिकाणच्या कार्यालयांतून ४२५ उमेदवारांनी ८८४ अर्ज घेतले.

पहिल्याच दिवशी ८८४ अर्जांची विक्री
औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज पहिल्याच दिवशी १० ठिकाणच्या कार्यालयांतून ४२५ उमेदवारांनी ८८४ अर्ज घेतले. कामदा एकादशीच्या मुहूर्तावर अनेक इच्छुकांनी अर्ज घेतले असून, महिला आरक्षित वॉर्डांसाठी पती व मुलांनी अर्ज घेतले. पालिकेला यातून ८५ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. सकाळी ११ वा. अर्ज व्रिकीस सुरुवात झाली. दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज विक्री सुरू होती.
१०० रुपयांना एक अर्ज असून एका उमेदवाराला चार अर्ज देण्यात येत आहेत. गांधीनगर वॉर्डासाठी ५४ अर्ज गेले, तर गुलमंडीसाठी पप्पू व्यास, प्रशांत म्हस्के, सुधीर नाईक, राजेश व्यास, तर राजेंद्र दानवे यांनी अजबनगर, खोकडपुरा वॉर्डासाठी अर्ज खरेदी केले.
७ तारखेपर्यंत अर्ज विक्री व स्वीकृतीची मुदत आहे. त्यामध्ये तीन दिवस सार्वजनिक सुट्या आल्या आहेत. त्यामुळे आजच अनेकांनी अर्ज घेऊन ठेवले आहेत. आघाडी आणि युतीचा निर्णय ४ एप्रिलपर्यंत झाल्यानंतर ६ व ७ रोजी अर्ज भरण्यासाठी सर्वाधिक गर्दी होण्याची शक्यता आहे.