महोत्सवात ६३८क्विंटल धान्य विक्री

By Admin | Updated: April 17, 2017 23:39 IST2017-04-17T23:37:13+5:302017-04-17T23:39:05+5:30

जालना: धान्य महोत्सवास तीन हजार पेक्षा अधिक नागरिकांनी भेट देऊन ६३८ क्विंटल धान्य तर क्विंटल मिरची, हळद, फळ मिळून २८ क्विंटची विक्री झाली

Sales of 638 quintals of grain in the festival | महोत्सवात ६३८क्विंटल धान्य विक्री

महोत्सवात ६३८क्विंटल धान्य विक्री

जालना: कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) जालना व कृषि विभाग, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धान्य महोत्सवास तीन हजार पेक्षा अधिक नागरिकांनी भेट देऊन ६३८ क्विंटल धान्य तर क्विंटल मिरची, हळद, फळ मिळून २८ क्विंटची विक्री झाली. तीन महोत्सवाचा सोमवारी रात्री उशिरासमारोप झाला.
तीन दिवसांत गहू ३९१ क्विंटल, ज्वारी ५९ क्विंटल, बाजरी ९ क्विंटल, तूरडाळ २२ क्विंटल, उडीद डाळ २ क्विंटल, मूग डाळ ७ क्विंटल, हरभरा डाळ ३ क्विंटल, मटकी, चवळी, मोहरी, राजगिरा मिळून ९ क्ंिवटल, हळद दोन क्विंटल, मिरची सात क्विंटल, मोसंबी १३ क्विंटल, द्राक्ष ११ क्विंटल, डाळिंब १ क्विंटल, आंबा कैरी १ क्विंटल तर सेंद्रीय खतापासून उत्पादित केलेले गहू ९५ क्विंटल, तूरडाळ ३ क्विंटल, ज्वारी ३२ क्विंटल, मूगडाळ २ क्विंटल, उडीद डाळ १ क्विंटल, कांदा तीन क्विंटल विक्री झाली. महोत्सवात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे शेतकरी कंपनीचे माधवराव अंधारे, विजय म्हस्के, अंकुश परकाळ, एकनाथ शेजूळ, काकासाहेब जावळे यांनी सांगितले. असा महोत्सव पहिल्यांदाच आयोजित झाल्याने शेतकरी कंपन्यांनी उत्पादित मालास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. महोत्सव यशस्वी करण्यासाठी कृषी अधीक्षक अधिकारी दशरथ तांभाळे, आत्माचे संतोष आळसे, कृषी पणनतज्ज्ञ अविनाश भोसले, डी.एस. सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Sales of 638 quintals of grain in the festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.