एकाच प्लॉटची दोघांना विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:03 IST2021-09-12T04:03:27+5:302021-09-12T04:03:27+5:30

सुभान खान कादर खान (३८, रा. आजम कॉलनी, रोशनगेट) यांना १५ फेब्रुवारी रोजी शेख नदीम शेख इब्राहिम आणि खालेद ...

Sale of the same plot to both | एकाच प्लॉटची दोघांना विक्री

एकाच प्लॉटची दोघांना विक्री

सुभान खान कादर खान (३८, रा. आजम कॉलनी, रोशनगेट) यांना १५ फेब्रुवारी रोजी शेख नदीम शेख इब्राहिम आणि खालेद दाऊद खान यांनी हर्सूल येथील सहाशे चौरस फुटांचा प्लॉट ८ लाख रुपयांत विक्री केला. त्याआधारे नोटरी करारनामा करताना नदीम आणि खालेद यांनी अडीच लाख रुपये स्वीकारले, तर उर्वरित साडेपाच लाख रुपये ३० मार्च रोजी खरेदीखत करताना देण्याचे ठरले होते. मात्र, त्याचदरम्यान दोघांनी प्लॉटची दुसऱ्या व्यक्तीला विक्री केली. दरम्यान, सुभान यांनी वारंवार दोघांकडे पैशांची मागणी केली. तरीदेखील दोघे पैसे अथवा प्लॉट देत नसल्याचे पाहून अखेर सुभान यांनी सिटीचौक पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक हिवराळे करत आहेत.

Web Title: Sale of the same plot to both