अल्पवयीन मुलीचे विक्री प्रकरण ; धागेदोरे गुजरातपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:48 IST2017-10-03T00:48:04+5:302017-10-03T00:48:04+5:30
एका अल्पवयीन मुलीची विक्री केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील शिपाई राधिका छत्तरसिंग हिवाळे (रा.बांधकाम विभाग क्वार्टर्स) हिची सदर बाजार पोलिसांनी सोमवारी कसून चौकशी केली

अल्पवयीन मुलीचे विक्री प्रकरण ; धागेदोरे गुजरातपर्यंत
जालना : येथील एका अल्पवयीन मुलीची विक्री केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील शिपाई राधिका छत्तरसिंग हिवाळे (रा.बांधकाम विभाग क्वार्टर्स) हिची सदर बाजार पोलिसांनी सोमवारी कसून चौकशी केली. चौकशीत तिने आणखी काही संशयितांची नावे सांगितली असून, या प्रकरणाचे धागेदोरे गुजरातपर्यंत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
मध्यप्रदेश व गुजरातमधील दोघांची नावे राधिका हिवाळे हिने पोलिसांना चौकशीत सांगितली आहेत. या प्रकरणाशी संबंधित गुजरातमध्ये राहणारी व्यक्ती गुंड प्रवृत्तीची असून, त्याने यापूर्वीही अशा प्रकारचा गुन्हा केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मुलीस विकत घेणाºया राजस्थानमधील सुजितकुमार मोतीलाल लोहार याचीही पोलिसांनी चौकशी केली. लग्न करण्याच्या उद्देशानेचे आपण पीडित मुलीच्या बदल्यात अडीच लाख रुपये दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या प्रकरणात आणखी चार जणांची नावे समोर येत असून, त्यांना लवकचर अटक केली जाईल, असे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. शहरातील एका अल्पवयीन मुलीस राधिका हिवाळे हिने फूस लावून पळवून नेले होते. पोलिसांनी राजस्थानमधून या मुलीची सुटका करून शनिवारी वडिलांच्या स्वाधीन केले.