नशेसाठी खोकल्याच्या औषधाची विक्री
By Admin | Updated: November 16, 2016 00:31 IST2016-11-16T00:31:57+5:302016-11-16T00:31:33+5:30
बीड : शहरातील वीरशैवनगर भागात नशेसाठी खोकल्याच्या औषधाची अवैध विक्री करणाऱ्या दोन औषध विक्रेत्यांविरुद्ध सोमवारी पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

नशेसाठी खोकल्याच्या औषधाची विक्री
बीड : शहरातील वीरशैवनगर भागात नशेसाठी खोकल्याच्या औषधाची अवैध विक्री करणाऱ्या दोन औषध विक्रेत्यांविरुद्ध सोमवारी पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
सोनाजी जगन्नाथ टेकाळे व पशुपती सोनाजी टेकाळे (रा. पेठबीड) अशी आरोपींची नावे आहेत. औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे यांनी वीरशैवनगरातील कनकालेश्वर विद्यालयासमोरील टेकाळे यांच्या औषधी दुकानावर छापा टाकला. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय ग्राहकांना खोकल्याची औषधी नशेसाठी विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून डोईफोडे यांनी या दोघांविरुद्ध फिर्याद दिली. दुकान सील केले असून, तपास निरीक्षक अनिलकुमार जाधव करीत आहेत.
औषध निरीक्षक डोईफोडे यांनी ‘रिस्पेलिन’ नावाचे खोकल्याचे औषध, ‘रेझोलॅम’ नावाच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. त्याची एकूण किंमत ३,६३१ रुपये एवढी आहे. या औषधी तपासणीसाठी मुंबईतील प्रयोगशाळेत पाठविणार असल्याचे डोईफोडे म्हणाले. (प्रतिनिधी)