मुलांची विक्री; दुसऱ्या दलालाला कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:04 IST2021-09-13T04:04:15+5:302021-09-13T04:04:15+5:30

------------------------------------------ मारहाणीच्या गुन्ह्यात दोघांना पोलीस कोठडी औरंगाबाद : सुट्टे पैसे मागितल्याकारणाने फिर्यादीला लोखंडी पाईपने बेदम मारहाण करून ...

Sale of children; Closed to another broker | मुलांची विक्री; दुसऱ्या दलालाला कोठडी

मुलांची विक्री; दुसऱ्या दलालाला कोठडी

------------------------------------------

मारहाणीच्या गुन्ह्यात दोघांना पोलीस कोठडी

औरंगाबाद : सुट्टे पैसे मागितल्याकारणाने फिर्यादीला लोखंडी पाईपने बेदम मारहाण करून जखमी केल्याच्या गुन्ह्यात सागर सखाराम कांबळे आणि गौतम तोताराम दाभाडे या दोघांना १४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. मुळे यांनी रविवारी दिले. साहाय्यक सरकारी वकील भाग्यश्री संचेती यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

---------------------------------------

पोलीस भरतीत तोतयागिरी करणारे तुरुंगात

औरंगाबाद : पोलीस भरतीमध्ये डमी उमेदवार बसवून तोतयागिरी करणाऱ्या महिलेसह तिच्या साथीदाराची न्यायालयीन कोठडीत हर्सूल तुरुंगात रवानगी करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी पी.पी. मुळे यांनी रविवारी दिले. पूजा रामदास दिवेकर आणि आकाश भाऊलाल राठोड अशी आरोपींची नावे आहेत.

----------------------------------------------

२५ लाखांची फसवणूक करणारे कारागृहात

औरंगाबाद : शेतकऱ्याला फ्लॅट घेऊन देण्याचे आमिष दाखवून तब्बल २५ लाखांची फसवणूक करणारे आदित्य रत्नाकर गारपगारे आणि योगेश पंडित उभेदळ या दोन आरोपींची न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात रवानगी करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. मुळे यांनी रविवारी दिले.

Web Title: Sale of children; Closed to another broker